Phone Taping Case : फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्ला यांना दिलासा, काय झाला निर्णय

IPS Rashmi Shukla Phone Taping Case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत आल्या होत्या. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. संजय राऊत, नाना पटोले आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंगचे हे प्रकरण होते.

Phone Taping Case : फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्ला यांना दिलासा, काय झाला निर्णय
rashmi shuklaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:36 PM

पुणे | 8 सप्टेंबर 2023 : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत होत्या. त्यांना दिलासा मिळाला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात थेट वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव घेतले गेले होते. या प्रकरणी दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हे प्रकरण संपणार असल्याची शक्यता आहे.

काय ते प्रकरण

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुखपदी रश्मी शुक्ला होत्या. त्यांनी विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. संजय राऊत, नाना पटोले आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. पुणे येथील प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. यानंतर सीबीआयवर विरोधकांनी टीका केली होती.

नाना पटोले यांनी केली होती टीका

विरोधकांची मुस्कटदाबी करुन अधिकाऱ्यांचे प्रमोशन करायचे हे भाजपाचे ठरलेले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळणार हे माहिती होते. असे नाना पटोले यांनी म्हटले होते. सीबीआयने कोणत्या आधारावर रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट दिली, त्याचे उत्तर द्यावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा

आता या प्रकरणात मिळाला दिलासा

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर दोन गुन्हे दाखले झाले होते. पुणे येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याचे पहिले प्रकरण होते. त्याप्रकरणी याआधीच सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला. त्यानंतर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी देण्यास राज्य सरकारकडून नकार दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाकडून रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांच्या विरोधात नोंदवलेल्या दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.