Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी छत्रपतींच्या मोर्चात आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ? वाचा 7 मोठे मुद्दे

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. त्यांच्याच वंचित आघाडीनं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडकी भरवली होती. पण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी.

संभाजी छत्रपतींच्या मोर्चात आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ? वाचा 7 मोठे मुद्दे
prakash ambedkar
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 12:57 PM

कोल्हापूर: प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. त्यांच्याच वंचित आघाडीनं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडकी भरवली होती. पण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. तरीही प्रकाश आंबेडकरांचं राजकीय महत्व कमी होत नाही. एक विचार करणारा, मांडणारा नेता म्हणूनच महाराष्ट्र त्यांचा आदर करतो. विशेष म्हणजे राजकीय तोटा दिसत असतानाही ते निर्णय घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळेच बाळासाहेबांचे निर्णय कधी धाडसी वाटतात तर कधी आत्मघातकी. पण एक निश्चित. ते कधीच कुणाच्या दावणीला बांधलेले नेते नसतात. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्गही. तो वर्ग फक्त दलित आहे असं नाही तर बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीत तो पसरलेला आहे. आता तर त्यांनी थेट मराठा मोर्चात सहभागी होऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. तसच नव्या राजकीय आघाडीची तर ते तयारी करत नाहीत ना अशी चर्चा आता रंगू लागलीय. पाहुयात 7 मुद्यांच्या आधारे. (is sambhaji chhatrapati and prakash ambedkar can change maharashtra politics?)

1. वंचितचा बेस वाढणार

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी आणि महाराष्ट्र विधानसभेलाही वंचित हा मोठा फॅक्टर होता. तो किती जागा जिंकतो यापेक्षा कुणाचे किती उमेदवार पाडतो याचीच चर्चा जास्त होती. लोकसभेला 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला 50 हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती. खुद्द अकोल्यात प्रकाश आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते तर आता भाजपात असलेले आणि त्यावेळेस वंचित आघाडीत असलेल्या गोपीचंद पडळकर यांना अडीच लाखापेक्षा जास्त मते होती. याचाच अर्थ असा की, वंचितची राजकीय ताकद आहे पण ती निवडुण येण्यास कमी पडते. आता प्रकाश आंबेडकर मराठा मोर्चात सहभागी झालेत. त्यामुळे वंचितचा बेस वाढण्यास मदत होऊ शकते.

2. नव्या आघाडीची मुहूर्तमेढ

शिवशक्ती आणि भीमशक्ती हे महाराष्ट्राला परिचीत असलेले शब्द आहेत. पण ते शिवसेना आणि रामदास आठवले यांच्या एकत्र येण्यावर जास्त वापरले गेले. आताही हे दोन्ही शब्द वापरले जातायत पण त्याचे संदर्भ मात्र वेगळे आहेत. शिवशक्ती म्हणजे संभाजी छत्रपतींची मराठा शक्ती आणि भीमशक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची भीमशक्ती. विशेष म्हणजे दोघेही जण महाराष्ट्रातल्या दोन महापुरूषांचे वंशज आहेत. ह्या दोघांनी म्हणजेच, संभाजी छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांनी एक स्वतंत्र आघाडीही तयार करावी अशी मागणीही होते आहे आणि तिची चर्चाही आहे. आताचा जो मुकमोर्चा आहे आणि त्यात आंबेडकरांचा सहभाग हा अशा नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवू शकतो.

3. महापालिका, झेडपी निवडणुकीवर थेट परिणाम

नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात निवडणुकाच निवडणुका असल्याचं नाना पटोलेंनी जाहीर केलं आहे. त्यात मुंबईसह महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मोठ्या महापालिकांचा समावेश आहे. तसच जवळपास सर्वच जिल्हा परिषदांचीही निवडणूक आहे. याचाच अर्थ ह्या निवडणुकांना मिनी विधानसभेचं महत्व आहे. एवढच नाही तर सध्याचं आघाडीचं सरकार कसं काम करतं आहे त्यावरचा रेफरंडम म्हणूनही ह्या निवडणुकांकडे पाहिलं जातं आहे. याच निवडणुकांच्या निकालावर ह्या सरकारचं भवितव्यही टिकलेलं आहे. ह्या निवडणुकीत सर्वात महत्वाचा फॅक्टर असेल तो मराठा आरक्षण. प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या लढ्यात सहभाग घेतलेला आहे, त्याचा थेट परिणाम निवडणुकांच्या गणितावर दिसून येईल.

4. स्वत:ची प्रतिमा उंचावणार

गेल्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र विभागलेला आहे. सरकार असोत की विरोधक मराठा विरुद्ध ओबीसी अशा कचाट्यात सापडलेले आहेत. एकाची बाजू घेतली तर दुसऱ्या बाजुची राजकीय गणितं चुकताना दिसत आहेत. अशा स्थितीत प्रकाश आंबेडकरांना गरिब मराठा-श्रीमंत मराठा अशी मांडणी करत ठोस भूमिका घेतलेली आहे. गरिब मराठ्यांना आरक्षण द्याच अशी धाडसी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतल्यामुळे त्यांची साजामिक प्रतिमा उंचवल्याचं दिसतं आहे.

5. भाजप आघाडीशी जवळीक

प्रकाश आंबेडकरांची वंचित ही भाजपची बी टीम असल्याची टिका काँग्रेस राष्ट्रवादीनं नेहमीच केली आहे. त्याला कारण आहे ते प्रकाश आंबेडकरांचे काही निर्णय. विधानसभेला आम्ही काँग्रेसला काही जागा सोडू पण त्यात राष्ट्रवादी नको अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली होती. फडणवीसांनी तर आगामी विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीचा नाही तर वंचितचा विरोधी पक्ष नेता असेल असं वक्तव्य केलं होतं. म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीचा पाडाव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा राजकीय वापर ते करत होते. आताही संभाजी छत्रपती हे भाजपकडूनच राज्यसभेवर आहेत. त्यांच्या मुकमोर्चात भाजपच्याच मंडळींचा वावर जास्त आहे. आंबेडकरही त्याच मोर्चात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर भाजपची बी टीम म्हणून आताही टिका होऊ शकते.

6. विधानसभेची तयारी

ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार असं जरी आघाडीचे नेते सांगत असले तरीसुद्धा ते तीन पक्षांचं सरकार आहे आणि प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यामुळेच हे सरकार अडीच एक वर्षात पडलं किंवा पाच वर्ष पूर्ण केले तरीसुद्धा आतापासूनच सर्वजण आगामी विधानसभेच्या तयारीत आहेत हे म्हणायला वाव आहे. त्या निवडणुकीला सामोरं जायचं तर एक अजेंडा लागेल, काही मुद्दे लागतील. मराठा आरक्षण हा मुद्दा लवकर संपेल असं दिसत नाही. त्यामुळेच राजकीय पक्ष त्याला अजेंडा करत आहेत. प्रकाश आंबेडकरांचाही मराठा आरक्षणाचा मुद्दा हातात घेऊन त्याच अजेंड्यावर काम करण्याचा प्रयत्न असू शकतो.

7. मागास घटक दुरावू शकतात

प्रकाश आंबेडकरांचा एक तोटा मात्र निश्चित आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसी त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात. त्यांनी जी अठरा पगड जाती आणि बलुतेदारांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला त्यातले अनेक समाज हे ओबीसीत आहेत. मराठा नेते आता ओबीसीत समावेश करण्याची मागणी करत आहेत. त्याला प्रकाश आंबेडकरांमुळे बळ मिळालं तर त्यांनी मिळवलेला बेस कमी होऊ शकतो. पुढे पाट आणि मागे सपाट अशी अवस्था आंबेडकरांची होऊ शकते. राज्यात एससी विरुद्ध मराठा असाही संघर्ष राहीलेला आहे. भीमा-कोरेगाव, त्यानंतर मुंबईत उसळलेली दंगल, हे कसे विसरले जातील? आंबेडकरांच्या नव्या भूमिकेमुळे त्यांचा मुळचा बेस कमी होऊ शकतो. (is sambhaji chhatrapati and prakash ambedkar can change maharashtra politics?)

संबंधित बातम्या:

Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचीच निवड का?; वाचा सविस्तर

Maratha Morcha Kolhapur Live : संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण

Maratha Morcha : मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादांची एन्ट्री, काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरू

(is sambhaji chhatrapati and prakash ambedkar can change maharashtra politics?)

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.