Pune crime : एसयूव्ही गाडी विकण्याच्या बहाण्यानं सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याची फसवणूक, पुण्याच्या चाकणमधला प्रकार

क्रारदार हिंजवडीस्थित एका आयटी कंपनीत काम करतात. वैयक्तिक वापरासाठी एखादी जुनी, वापरलेली गाडी त्यातही एसयूव्ही मॉडेलमधील वाहन त्यांना हवे होते. ऑनलाइन वेबसाइट ब्राउझ करत असताना, त्यांना एके ठिकाणची जुनी चारचाकी आवडली आणि नंतर त्यांनी व्यवहार केला.

Pune crime : एसयूव्ही गाडी विकण्याच्या बहाण्यानं सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याची फसवणूक, पुण्याच्या चाकणमधला प्रकार
कल्याणमध्ये नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाशImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 6:46 PM

पुणे : एसयूव्ही गाडी विकण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने सॉफ्टवेअर व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. चाकणमध्ये ही घटना घडली. वापरलेली जुनी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (Sports utility vehicle) विकण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीने 32 वर्षीय सॉफ्टवेअर व्यावसायिकाची जवळपास 6.2 लाख रुपयांची फसवणूक (Duped) केली. गुरुवारी दुपारी संशयिताने एसयूव्ही दाखवली आणि त्याचा साथीदार तक्रारदाराकडून पैसे घेऊन निघून गेला. त्यानंतर संशयिताने वाहनाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती घेण्याच्या बहाण्याने त्या तांत्रिकाला सोबत नेले. त्यांनी आळंदी फाट्यावर थांबून तक्रारदाराला फोटोकॉपी आणण्यास सांगितले. तक्रारदार दुकानात असतानाच संशयित व्यक्ती कार घेऊन पळून गेला. याप्रकरणी तक्रार दाखल (Filed a case) करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीने चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन शोधत होते कार

चाकण पोलिसांच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले, की तक्रारदार हिंजवडीस्थित एका आयटी कंपनीत काम करतात. वैयक्तिक वापरासाठी एखादी जुनी, वापरलेली गाडी त्यातही एसयूव्ही मॉडेलमधील वाहन त्यांना हवे होते. ऑनलाइन वेबसाइट ब्राउझ करत असताना, त्यांना एके ठिकाणची जुनी चारचाकी आवडली. वेबसाइटवर विक्रीसाठीची ती पोस्ट होती, असे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

6.2 लाख रुपयांचा व्यवहार

त्यांनी तांत्रिक सहायकाला पैसे देऊन गाडी घेऊन जाण्याची विनंती केली. दोन दिवसांत बँकेची एनओसी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी 6.2 लाख रुपयांचा व्यवहार झाला. संशयित आणि तंत्रिक सहायक यांनी हस्तांतरण फॉर्म आणि विक्री नोटवर स्वाक्षरी केली. त्यानंतर तो तांत्रिक सहायक पैसे घेऊन तेथून निघून गेले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, याप्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही प्रकारे व्यवहार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषत: ऑनलाइन माहिती घेऊन व्यवहार करणार असाल, तर ज्याच्याशी व्यवहार करायचा आहे, त्याची पार्श्वभूमी तपासावी, जेणेकरून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या घटना टाळता येतील, असे पोलिसांनी सांगितले.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.