Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMO मधील तोतया अधिकाऱ्याने पुणे येथील विद्यापीठाला गंडवले, काय प्रकार जाणून घ्या

पंतप्रधान कार्यालयातील तोतया अधिकारी असलेला किरण पटेल याचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. तो पुणे येथील विद्यापीठात सल्लागार होता. विद्यापीठ प्रशासनाकडे किरण पटेल याचा प्रोफाईल आला होता. त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन त्याची नियुक्ती करण्यात आली होती.

PMO मधील तोतया अधिकाऱ्याने पुणे येथील विद्यापीठाला गंडवले, काय प्रकार जाणून घ्या
पंतप्रधान कार्यालयातील तोतया अधिकारी
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:32 AM

पुणे : पंतप्रधान कार्यालयात (PMO) वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून जम्मू-काश्मिरातील फसवणुकीचे प्रकरण पुणे शहरापर्यंत आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांची फसवणूक करणाऱ्या त्या ठगाला Z-Plus सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली होती. त्याला बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी दिली गेली होती. त्याच्या राहण्यासाठी 5 स्टार हॉटेलची सुविधा केली गेली होती. मग त्या पठ्याने टॉप अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होता. तसेच त्याने SDM रँकच्या अधिकाऱ्यासोबत नियंत्रण रेषेचा (LOC) अनेक वेळा दौरा केला होता. आता त्या अधिकाऱ्याचे पुणे कनेक्शन समोर आले आहे.

पुणे शहरात कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी किंगडम ऑफ टोंगा (Kingdom of Tonga) आहे. त्या विद्यापीठाने पंतप्रधान कार्यालयातील बनावट अधिकारी असलेला किरण पटेल याला सल्लागार नेमले होते. विद्यापीठ प्रशासनाकडे किरण पटेल याचा प्रोफाईल आला होता. त्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन अहमदाबादमध्ये किरण पटेल याची भेट घेतली. त्याच्याशी चर्चा झाली. त्या चर्चेने अधिकारी चांगलेच प्रभावित झाले. त्यांनी दाखवलेल्या व्हिडिओने चांगला प्रभाव पडला.

या चर्चेत किरण पटेल याने आपला आणि पंतप्रधान कार्यालयाचा संबंध दाखवला. पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त संचालक असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे विद्यापीठाने त्याची नियुक्ती सल्लागार म्हणून केली. नियुक्ती करण्यापूर्वी विद्यापीठाने त्याच्या सर्व सोशल मीडियावरील प्रोफाईल तपासला. त्यात उल्लेख पीएमओचा होता. अन् हा उल्लेख दीर्घकाळापासून असल्याचे दिसत होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला त्याच्यावर विश्वास बसला. अन त्याची नियुक्ती केली.

हे सुद्धा वाचा

आता पोलिसांचे आले पत्र

पुणे शहरात कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी किंगडम ऑफ टोंगाला जम्मू-काश्मीर पोलिसांचे पत्र आले. विद्यापीठाने त्याला उत्तर दिले आहे. परंतु अद्याप चौकशीसाठी पोलीस आले नाही. विद्यापीठाने किरण पटेल याची सल्लागारपदारवरुन हाकालपट्टी केली आहे. त्यासंदर्भातील मेल किरण पटेल याला पाठवला. परंतु हा मेल बाऊन्स झाला आहे. विद्यापीठाची कोणतीही आर्थिक फसवणूक किरण पटेल याने केली नाही. यामुळे विद्यापीठाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास तक्रार देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा सापडला जाळ्यात

किरण पटेल याच्यावर संशय जम्मू  सीआयडीला आला. त्यांनी तपास केला असता तो बनावट अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला 10 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र ते गुप्त ठेवण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणाचा खुलासा केला. त्याच्यावर भादंवि 419, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातमी बनावट अधिकाऱ्यास Z-Plus सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी अन् 5 स्टार हॉटेलची सुविधा..वाचा सविस्तर

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....