Pune crime : नोकरी नाही, त्यातच 24 लाखांची फसवणूक; बॅडमिंटन कोर्ट बांधण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्याला खावी लागतेय तुरुंगाची हवा

अमितकुमार पटेल यांनी गणेश ढोरे याच्या ओळखपत्रांची पडताळणी न करता ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे ढोरेच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. ढोरे हे काम पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतर पटेल यांनी परताव्याची मागणी केली, परंतु ती त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

Pune crime : नोकरी नाही, त्यातच 24 लाखांची फसवणूक; बॅडमिंटन कोर्ट बांधण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्याला खावी लागतेय तुरुंगाची हवा
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: Wiki
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:34 PM

पुणे : बॅडमिंटन कोर्ट बांधण्याच्या बहाण्याने फसवणूक (Fraud) करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी हा प्रकार घडला होता. एका बेरोजगार तरुणाची जवळपास साडे 25 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. आता या फसवणूकप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. लोहगाव येथील डीवाय पाटील महाविद्यालयासमोर बॅडमिंटन कोर्ट (Badminton court) बांधण्याच्या बहाण्याने हा प्रकार करण्यात आला. मागील वर्षी 25 सप्टेंबरपासून एका 33 वर्षीय तरुणाला 24.49 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बुधवारी रात्री एकाला अटक (Arrested) करण्यात आली. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली. राजगुरूनगर येथील गणेश ढोरे असे संशयिताचे नाव आहे. पटेल यांनी आधी संबंधित व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र सहा महिन्यांत देतो, असे सांगून अखेरपर्यंत टाळाटाळ केली. शेवटी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ऑनलाइन जाहिरात आणि बोली

उपनिरीक्षक अशोक गंधाले यांनी गुरुवारी सांगितले, की तक्रारदार, लोहगाव येथील अमितकुमार पटेल (33) यांना त्यांच्या सासरच्यांनी बॅडमिंटन कोर्ट बांधण्यासाठी आणि खेळाडूंना भाड्याने देण्यासाठी आर्थिक मदत केली. कारण त्यामुळे त्यांना दर महिन्याला काही पैसे मिळतील. ते म्हणाले, की पटेल यांनी ऑनलाइन जाहिरात जारी केली होती, ज्यात बॅडमिंटन कोर्ट बांधण्याचा अनुभव असलेल्या लोकांकडून बोली लावण्यात आली. राजगुरूनगर येथील गणेश ढोरे याने या बोलीस प्रतिसाद देत पटेल यांच्याशी संवाद सुरू केला. त्यानंतर त्यांनी पटेल यांची भेट घेतली आणि बांधकाम सुरू करण्यासाठी 24.49 लाख रुपये हप्ते जमा करण्यास राजी केले.

हे सुद्धा वाचा

कागदपत्रांची पडताळणी न करता व्यवहार

गंधाले म्हणाले, की पटेल यांनी गणेश ढोरे याच्या ओळखपत्रांची पडताळणी न करता ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे ढोरेच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. ढोरे हे काम पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतर पटेल यांनी परताव्याची मागणी केली, परंतु ती त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. ढोरे याने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पटेल यांनी तक्रार अर्ज दाखल केला. ढोरे याला बोलावले असता सहा महिन्यांत पैसे परत करू, असे लेखीही दिले, पण काहीही झाले नाही. अखेर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.