Karuna Sharma : करुणा शर्मांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, पुणे न्यायालयाचा निर्णय; अॅट्रोसिटीचा दाखल आहे गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्यावर मागील वर्षी सप्टेंबर (2011) बीडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.

Karuna Sharma : करुणा शर्मांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, पुणे न्यायालयाचा निर्णय; अॅट्रोसिटीचा दाखल आहे गुन्हा
करुणा शर्मा (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:02 PM

पुणे : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. करुणा शर्मा यांच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटकही करण्यात आली. आता त्यांची न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) रवानगी रवानगी करण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा प्रकाशझोतात आल्या होत्या. आता जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शर्मांसह त्यांचा पीए म्हणून वावरणाऱ्या अजय देढे यालादेखील काल पोलिसांनी अटक केली होती. याच अजय दाढेच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada police) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली. आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने याप्रकरणी करुणा शर्मांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

जातीवाचक शिवीगाळप्रकरण

पती अजय देढे आणि करुणा शर्मा यांनी पुणे येथील भोसरी परिसरात देढे याच्या पत्नीला बोलावले. त्यानंतर हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावले, यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली त्याचबरोबर पती अजय कुमार देढेने आपल्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक, शारीरिक त्रास दिला, असे 32 वर्षीय पीडितेने तक्रारीत म्हटले होते. येरवडा पोलिसांत पीडितेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा पती आणि करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

हे सुद्धा वाचा

आधीही करुणा शर्मांवर दाखल झाला होता गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्यावर मागील वर्षी सप्टेंबर (2011) बीडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शर्मा यांची गाडी बाजारात आली असल्याचे दिसते. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही वेळ बाजारात थांबली. त्याचाच फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचे व्हिडिओत दिसत आले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.