कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा आता मोकळा झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर
गावपुढारी
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 7:35 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा आता मोकळा झाला आहे. करवीर,पन्हाळा, गडहिंग्लज,शिरोळ शाहूवाडी,भुदरगड या तालुक्यातील 236 गावांची सरपंच निवड 25 फेब्रुवारीला होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. (Kolhapur 6 taluka Sarpanch And Deputy Sarpanch Election Programme)

गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. सुनावणी अंती 15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवारी दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश  आता देण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील उंड्री ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश  आज देण्यात आला.

करवीर तालुक्यातील  कोगे व खुपिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश आज देण्यात आला.

शाहूवाडी तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश  आज देण्यात आला.

भुदरगड तालुक्यातील फणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 17 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे.

त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणूक झालेल्या 45 निवडणुकांमधील वरील प्रवर्गातील 16 ग्रामपंचायतींच्या पहिला सभा घेण्यासाठी उर्वरित 29 ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेचा आदेश फेर आरक्षण दि. 22 फेब्रुवारीनंतर पारित करण्यात येणार आहे.  त्यानुसार तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश  आज देण्यात आला.

शिरोळ तालुक्यातील शिरटी, मजरेवाडी, तमदलगे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तालुक्यातील 9 फेब्रुवारी रोजी द्यावयाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेशित केलेले होते. याचिकेच्या सुनावणीअंती 15 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सभा बोलावण्याचा आदेश देण्यात आला.

(Kolhapur 6 taluka Sarpanch And Deputy Sarpanch Election Programme)

हे ही वाचा :

पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.