Video : कोल्हापुरात गुरांच्या गोठ्याला भीषण आग, मुकी जनावरं होरपळली, लाखोंचं नुकसान

चंदगड तालुक्यातील अडकुर गावात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत एका म्हशीचा मृत्यू तर तीन जनावरे गंभीररित्या भाजली आहेत. | Kolhapur Chandgad Cattle Shade Fire

Video : कोल्हापुरात गुरांच्या गोठ्याला भीषण आग, मुकी जनावरं होरपळली, लाखोंचं नुकसान
चंदगडमध्ये जनावरांच्या गोठ्याला भीषण आग
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 9:31 AM

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील अडकुर गावात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत एका म्हशीचा मृत्यू तर तीन जनावरे गंभीररित्या भाजली आहेत. शेतकरी प्रशांत पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात ही दुर्घटना घडली आहे. (Kolhapur Chandgad Cattle Shade Fire)

सविस्तर माहिती अशी की, नेहमीप्रमाणे शेतकरी प्रशांत पाटील यांनी आपल्या गोठ्यात गुरं बांधली होती. अचानक गोठ्याला आग लागल्याने जनावरांनी मोठ्याने हंबरायला सुरुवात केली. जनावरांच्या आवाजाने आणि धुरांच्या लोटाने पाटील यांना ही आग लागल्याची समजलं.

या दुर्घटनेत एका म्हशीचा मृत्यू तर तीन जनावरे गंभीररित्या होरपळली आहेत. प्राथमिक अंदाजावरुन सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसंच गवताची गंजी आणि इतर पीकही जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.

(Kolhapur Chandgad Cattle Shade Fire)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ क्लीप ऐकली, पतीकडून नवविवाहितेची हत्या

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.