कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आता विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात
पुण्यात जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे '1 जानेवारी 2018' रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.
पुणे – कोरेगाव भीमामध्ये 2018 साली घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil)यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Violence) चौकशी आयोगाकडून ही चौकशी केली जाणार आहे. या हिंसाचार प्रकरणी नुकतेच आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आली आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते(Ashish Satpute) यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे,याप्रकरणात त्यांची साक्ष महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.
रश्मी शुक्ला यांची तब्बल 6 तास चौकशी
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या समोर माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी झाली. चौकशी दरंयान त्यांनी पूर्ण सहकार्य केल्याची माहितीही आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे.चौकशी दरम्यान रश्मी शुक्ला यांनी प्रतिज्ञा पत्रही सादर केलं आहे. पुण्यात जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे ‘1 जानेवारी 2018’ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची गोपनीय माहिती तसेच इतर कागदपत्रे सादर केलेली होती. त्याअनुषंगाने त्यांची आयोगासमोर साक्ष घेणे आवश्यक असल्याने त्यांचेही नाव अर्जात नमूद करण्यात आले आहे.
Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?