Pune Politics : पुण्यात प्रमुख राजकीय पक्षांचं नेतृत्व मराठा समाजाकडे! आता काँग्रेसनंही बदलला शहराध्यक्ष; वाचा सविस्तर…

पुण्यातील विविध पक्षांतील विद्यमान शहराध्यक्षांवर नजर टाकल्यास मराठा समाजातील व्यक्तीला प्राधान्य दिल्याचे दिसते. निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. पक्षाचा प्रचार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन युक्त्या पक्षांकडून (Political parties) योजल्या जात आहेत.

Pune Politics : पुण्यात प्रमुख राजकीय पक्षांचं नेतृत्व मराठा समाजाकडे! आता काँग्रेसनंही बदलला शहराध्यक्ष; वाचा सविस्तर...
विविध पक्षांचे पुणे शहराध्यक्षImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 4:24 PM

पुणे : पुणे महापालिका (PMC Election) निवडणूक जवळ येवू लागली आहे, तशी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. पक्षाचा प्रचार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन युक्त्या पक्षांकडून (Political parties) योजल्या जात आहेत. त्यातच पुण्यातील राजकीय पक्ष आपल्या शहराध्यक्ष पदाच्या बाबतीतही निर्णय घेताना दिसत आहेत. नुकताच काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पाच वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसने (Congress) आता नवा चेहरा शहराध्यक्षपदाला दिला आहे. अरविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेमधील अंतर्गत कलह आणि भोंगा आंदोलनानंतर शहराध्यक्षपद बदलण्यात आले होते. एकूणच विविध पक्षांतील विद्यमान शहराध्यक्षांवर नजर टाकल्यास मराठा समाजातील व्यक्तीला प्राधान्य दिल्याचे दिसते. जाणून घेऊ या…

प्रशांत जगताप – राष्ट्रवादी

मागील वर्षी 7 मे 2021 रोजी प्रशांत जगताप यांची पुण्याच्या शहराध्यक्षपदी निवड झाली. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांनी निवड करण्यात आली. मराठा समाजाचा चेहरा राष्ट्रवादीने दिला आहे. गेल्या 21 वर्षांपासून पक्षसंघटनेत कार्यरत आहेत. 2016-17मध्ये पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषवले होते. जगताप यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे. 2007, 2012 आणि 2017 मध्ये ते निवडून आले आहेत. 2012मध्ये पीएमपीचे संचालकपदही त्यांनी सांभाळले होते.

अरविंद शिंदे – काँग्रेस

सहा वर्ष पदावर असलेल्या रमेश बागवे यांच्यानंतर काँग्रेसने शहराध्यक्षपदाची धुरा मराठा समाजातील अरविंद शिंदे यांच्यावर सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले. अरविंद शिंदे यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपद, विरोधीपक्ष नेता तसेच काँग्रेस गटनेता अशा विविध पदांवर काम केले आहे. दरम्यान, जवळपास 30 वर्षांनंतर काँग्रेसने मराठा समाजाला शहराध्यक्ष केले आहे.

हे सुद्धा वाचा

जगदीश मुळीक – भाजपा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बददला जाण्याची चर्चा सुरू असली तरी सध्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील जगदीश मुळीक यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मुळीक हे 2014मध्ये पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे प्रथम टर्म सदस्य होते. तर 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी मतदारसंघातून जगदीश मुळीक यांना पराभूत केले.

संजय मोरे – शिवसेना

15 सप्टेंबर 2019ला शिवसेनेने मराठा सामाजातील संजय मोरे यांना शहराध्यक्षपद दिले. मोरे यांनी गटप्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रीय सहभाग असणारे ते नेते आहेत.

साईनाथ बाबर – मनसे

मनसेमधील अंतर्गत वाद तसेच भोंग्यांच्या आंदोलनानंतर वसंत मोरे यांच्याकडून काढून शहराध्यक्षपद साईनाथ बाबर यांना नुकतेच देण्यात आले. मनसेच्या विविध आंदोलनात साईनाथ बाबर यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.