जीव गेला तरी बेहत्तर पण जुन्नर बिबट सफारी बारामतीकरांच्या घशात जाऊ देणार नाही; असा इशारा राष्ट्रवादीला कुणी दिला?
बिबट ही जुन्नर तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे बिबट सफारी जुन्नर तालुक्यात व्हावी यासाठी शिवसेनेकडून 2015 पासुन प्रयत्न करण्यात येत आहे तरीही ही बिबट सफारी बारामतीमध्ये जात असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील शिवसेना व जनता गप्प बसणार नाही
पुणेः ज्या जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ज्या तालुक्याने गेल्या कित्येक वर्षांपासून बिबट्या (Leopard) आणि मानव संघर्ष केला आणि वन विभागाच्या मदतीने हा संघर्ष मिठवण्यातही आला. अशा या निसर्गसंपन्न तालुक्यात बिबट्यांची संख्याही लक्षणीय होती. ऊस तोडणीच्या काळात अनेकदा उसाच्या फडात बिबट्यांची पिल्ले सापडल्यानंतरही त्या पिल्लांना सुरक्षितस्थळी पोहचविण्याचे काम जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) नागरिकांनी आणि वन्यप्रेमी संघटनांनी केली आहे. त्यामुळे बिबट ही जुन्नर तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे बिबट सफारी (Bibat Safari) जुन्नर तालुक्यात व्हावी यासाठी शिवसेनेकडून 2015 पासुन प्रयत्न करण्यात येत आहे तरीही ही बिबट सफारी बारामतीमध्ये जात असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील शिवसेना व जनता गप्प बसणार नाही असा इशारा जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीचा पायलट प्रोजेक्ट बारामतीला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ठिणगी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प बारामतीला गेला तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष पाहायला मिळणार असं चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना व जनता गप्प राहणार नाही
हा प्रकल्प बारामतील घेऊन जात असतील तर जुन्नर तालुक्यातील शिवसेना व जनता गप्प राहणार नाही. आम्ही आमची प्रस्तावित बिबट सफारीचा प्रोजेक्ट बारामतीच्या घशात घालुन देणार नाही, याबाबत आम्ही प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही जुन्नर तालुक्यातील शिवसेनेने दिला आहे. तसेच जीव गेला तरी बेहत्तर पण आम्ही जुन्नर बिबट सफारी बारामतीकरांच्या घशात जाऊन देणार नाही असा इशाराही जुन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यानी दिला आहे.
बिबट्यांसाठी आवश्यक असणारा नैसर्गिक आदिवास
जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे येथील नागरिक आणि वन्य प्राणी संघटनांनीही यासाठी बिबट्यांचा आदिवास अबाधित राहावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. बिबट्यांसाठी आवश्यक असणारा नैसर्गिक आदिवास जुन्नरमध्ये अनुकूल असल्याने बिबट सफारीचा प्रकल्प हा जुन्नरमध्येच असावा यासाठी येथील नागरिक आग्रही आहेत. यावेळी अर्थसंकल्पात बिबट प्रकल्प बारामतीला हलविणार असे सांगण्यात आले असले तरी शिवसेनेकडून त्याला तीव्र विरोध करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
पिंपरीतील सराईत गुंडावर मोक्का, गणेश गायकवाडच्या टोळीवर कारवाई