कांदा विदेशात पाठवून नफा कमवण्याचे आमिष, लाखो रुपयांनी गंडवले
पुणे शहरातील कांदा व्यापाऱ्याची व्यवसायातून कर्नाटकामधील दोघांशी ओळख झाली. त्या दोघांनी विदेशात कांदा पाठवून मोठा नफा कमवण्याचे आमिष दाखवले. व्यापाऱ्याकडून त्यांनी कांदा घेतला. परंतु त्याचे पैसे दिले नाही. वारंवार मागणी करुनही पैसे मिळाले नाही.
पुणे : सर्वसामान्यप्रमाणे व्यापाऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. व्यापाऱ्यात नफा कमवण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. आता पुणे शहरातील एका कांदे व्यापाऱ्याची अशीच फसवणूक केली गेली आहे. विदेशात कांदा पाठवून लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्यापाऱ्याची फसवणूक करणारे दोन्ही जण कर्नाटकातील आहे.
नेमके काय झाले
पुणे शहरातील एका कांदा व्यापार्याची कर्नाटकमधील आरोपींची व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. सिद्धाप्पा ए. एल. एस. भंडारी व गजेंद्र सिद्धप्पा (राहणार, कर्नाटक) यांनी फिर्यादीस लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवले. कांदा विदेशात पाठवून नफा कमवण्यात येणार असल्याचे पुणे येथील 32 वर्षीय व्यापाऱ्यास सांगितले. दोघांनी तब्बल 46 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता ही फसवणूक केली. ही घटना मार्च 2021 नंतर घडली आहे
अशी झाली ओळख
व्यवसायातून फिर्यादी आणि आरोपींची ओळख झाली. सिद्धाप्पा ए. एल. एस. भंडारी व गजेंद्र सिद्धप्पा यांनी आपण मोठे कांदे व्यापारी असल्याचे सांगितले. हळहळू त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. काद्यांचा माल विदेशात पाठवून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. व्यावसायिकाकडून आरोपींनी वेळोवेळी कांद्याचा माल घेतला. परंतु या मालाचे पैसे दिले नाही. एकूण 46 लाख 36 हजार रुपये परत न देता व्यापाऱ्याची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे.