Maval Assembly constituency: पुण्यातील मावळात राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा, आघाडीचा चक्क अपक्ष उमेदवारास पाठिंबा

Maval Assembly constituency: मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत वाढली आहे.

Maval Assembly constituency: पुण्यातील मावळात राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा, आघाडीचा चक्क अपक्ष उमेदवारास पाठिंबा
sharad pawar uddhav thackeray nana patole
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 2:42 PM

Maval Assembly constituency: विधानसभा निवडणूक जशीजशी जवळ येत आहेत, तसतसे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. जागा वाटपावर चर्चा होत आहेत. त्यावेळी महाविकास आघाडीने धक्कादायक निर्णय घेतला आहे. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार न देता थेट अपक्षाला पाठिंबा दिला आहे.

शेळकेंना भाजप कार्यकर्त्यांचाही धक्का

मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत वाढली आहे. मावळ विधानसभा निवडणुकीत राजकीय रंगत निर्माण झाली आहे. यापूर्वीच तालुक्यातील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या उमेदवारीला जाहीर निषेध केला होता.

महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचा विडा उचलला असल्याने आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या मावळात बापू भेगडे अपक्ष तर महायुतीचे सुनील शेळके यांच्यात कांटे की टक्कर होणार हे निश्चित झाले आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी

आमदार सुनील शेळके यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. दोघांचे मनोमिलन करून दिले. आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात दंड थोपटलेले बाळा भेगडे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढली. यामुळे आता बाळा भेगडे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचा प्रचार करणार आहे.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत रस्सीखेच

चिंचवड विधानसभेसाठी नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात रस्सीखेच, कलाटे पोहोचले जयंत पाटील यांच्या भेटीला पोहचले आहे. त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे आहेत. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. दुसऱ्या यादीतही केवळ पिंपरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे आणि चिंचवड पोटनिवडणूक अपक्ष लढणारे राहुल कलाटे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. आज शरद पवार गटाची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कलाटे यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.