AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा सहकारनगर पोलिसांना महागात, अमिताभ गुप्तांकडून तिघा अधिकाऱ्यांची बदली

अंत्ययात्रेतील भव्य बाईक रॅलीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकाराची पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली आहे. (Amitabh Gupta Bike rally funeral )

पुण्यातील सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा सहकारनगर पोलिसांना महागात, अमिताभ गुप्तांकडून तिघा अधिकाऱ्यांची बदली
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची अंत्ययात्रा बाईक रॅली प्रकरणी कारवाई
| Updated on: May 21, 2021 | 11:45 AM
Share

पुणे : सराईत गुन्हेगार माधव वाघाटेची अंत्ययात्रा पुण्यातील सहकारनगर पोलिसांना चांगलीच भोवली. अंत्ययात्रेतील बाईक रॅलीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकाराची पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ आणि गुन्हे अशा दोन्ही पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. (Pune Police Commissioner Amitabh Gupta transfer Sahkar Nagar Police Inspectors after Bike rally at the funeral of Criminal Madhav Waghate)

माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी पुण्यात 125 बाईक्सची रॅली काढण्यात आली होती. यावेळी कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले होते. यासंबंधी वृत्त प्रसारित झाल्यानंतर आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या जवळपास शंभर जणांना ताब्यात घेतले होते. तर त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या होत्या.

कोणाकोणाची बदली?

अंत्ययात्रेतील भव्य बाईक रॅलीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकाराची पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत ट्रान्सफर करण्यात आली आहे. तर सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सराईत गुन्हेगाराची हत्या

पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची शनिवारी पहाटे हत्या झाली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत बाईक रॅली

माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सिद्धार्थ पलंग, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके अशा वाघाटेच्या साथीदारांचा समावेश आहे. (Amitabh Gupta Bike rally funeral )

कोण होता माधव वाघाटे?

माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं.

पुणेकरांचा संताप

पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जात होता. सर्वसामान्य पुणेकरांना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईला समोरं जावं लागतं, मात्र सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी गर्दी झाल्याने कारवाईची मागणी होत होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

(Pune Police Commissioner Amitabh Gupta transfer Sahkar Nagar Police Inspectors after Bike rally at the funeral of Criminal Madhav Waghate)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.