AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant More | मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय

नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला

Vasant More | मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय
वसंत मोरेंना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवलं
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:09 PM

पुणे : मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसेचे डॅशिंग नगरसेवर वसंत मोरे (Vasant More) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढत असतानाच वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांची सही असलेला आदेश पक्षातर्फे जारी करण्यात आला आहे. मनसे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

आधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला

याआधी वसंत मोरेंनी पुण्यातील उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही सोडला होता. पक्षसंघटनासाठी बनवलेल्या ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. अखेर चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडणं पसंत केलं होतं. एका उपविभाग प्रमुखाच्या पोस्टवरुन ग्रुपमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर मोरेंनी ग्रुप सोडला आणि सिंहासनावर बसलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केला होता.

पुण्याचे मनसे पदाधिकारी मुंबईत

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत धूसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. त्यानंतर पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पुण्यातील नाराजीसंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याची शक्यता आहे. वसंत मोरेंना याबाबत कोणताही निरोप देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर वसंत मोरेंना शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आल्याचं वृत्त आहे.

वसंत मोरेंची अडचण काय?

वसंत मोरे पुण्यातील कात्रज प्रभागातून  गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीने मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातील मुस्लिम मतदार वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठीशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत आणि हीच मतं गेमचेंजर ठरतात. त्यामुळे वसंत मोरेंची अडचण झाल्याचं बोललं जात होतं.

पाहा मनसेच्या आदेशाचं पत्र

संबंधित बातम्या :

वसंत मोरेंना राज ठाकरेंचं बोलावणं, ‘शिवतीर्थ’वर बैठक; नाराजी दूर होणार?

NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…

Vasant More left group… भोंग्यावरुन बोंबाबोंब! पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी WhatsApp ग्रुप सोडला

ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.