राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला! ‘गोल्डमॅन’ रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी जाहीर, म्हणाला “मी कधीच…”

राज्यातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील तीन प्रमुख मतदारसंघांचा समावेश आहे. खडकवासला मतदारसंघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला! 'गोल्डमॅन' रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी जाहीर, म्हणाला मी कधीच...
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 11:46 AM

Ramesh Wanjale Son Mayuresh Wanjale Khadakwasla Constituency : राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मनसेने काल रात्री उशिरा आगामी विधानसभा निवडणुका लढणाऱ्या उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीत ४५ जणांचा समावेश असून मनसेकडून आतापर्यंत ४७ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मनसेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत पुण्यातील तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे आहेत. मनसेकडून कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर तर खडकवासला मतदारसंघातून मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

“राज ठाकरेंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. टीव्ही 9 मराठीने मयुरेश वांजळेंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी सर्वात आधी अखंड महाराष्ट्रातील मनसैनिकांचे आराध्यदैवत राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. खडकवासल्याच्या सिंहगड किल्ल्यावर यावेळी नक्कीच शिवमुद्रा फडकणार”, असे मयुरेश वांजळे म्हणाले. यावेळी त्यांनी माझी बहीण अजित पवार गटात असली तरी माझ्यासाठी काम करणार, असेही सांगितले.

रमेश वांजळे यांचा अल्पपरिचय

मनसेचे आक्रमक नेते आणि आमदार म्हणून रमेश वांजळे यांना ओळखले जाते. रमेश वांजळे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर खडकवासला मतदारसंघातून निवडून आले होते. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून मनसेत दाखल झालेल्या रमेश वांजळे यांनी मोठ्या मताधिक्याने पहिलीच विधानसभा निवडणूक जिंकली होती. रमेश वांजळे यांना सोनं घालण्याची मोठ्या प्रमाणावर हौस होती. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन, हातात ब्रेसलेट असल्याने त्यांना गोल्ड मॅन म्हणून ओळखले जायचे. मनसेचा एक आक्रमक आमदार म्हणून रमेश वांजळे हे प्रसिद्ध होते.

रमेश वांजळे यांचा १० जून २०११ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे मनसेने पुण्यातील धडाडीचा आमदार गमावला, अशी लोकभावना होती. वांजळे यांच्या मृत्यूनंतर तब्बल १३ वर्षांनी मनसेनं पुन्हा एकदा रमेश वांजळे यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे. रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता खडकवासल्याचे मतदार आपल्या दिवंगत नेत्याप्रमाणे त्याच्या मुलाची किती साथ देतात? हे पाहावं लागणार आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.