Maharashtra Bandh | पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद, व्यापारी महासंघाचाही बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद राहणार आहेत. तसा निर्णय पीएमपीएल प्रशासने घेतला आहे.

Maharashtra Bandh | पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद, व्यापारी महासंघाचाही बंदला पाठिंबा
pmpl
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 8:31 AM

पुणे : लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद राहणार आहेत. तसा निर्णय पीएमपीएल प्रशासने घेतला आहे.

याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धावणाऱ्या बसेस दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे 1400 बसेस आज बंद राहणार आहेत.

व्यापारी महासंघाचा दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा –

तर पुण्यात आज व्यापारी महासंघानं दुकानं बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, मंडई, शिवाजी रोडवरची दूकानं कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत दूकानं बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावर एकही दुकानं उघडलं गेलं नाहीये.

पीएमपीएल डेपोवर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन –

तर पीएमपीएल डेपोवर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहेत. स्वारगेट बस डेपो बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, दत्ता सागरे, भाऊ करपे रस्त्यावर बसून आंदोलन केलं.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबरला तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या :

Lakhimpur Kheri Violence : “अंगाला हात तर लावून दाखवा”, प्रियंका गांधी यूपी पोलिसांवर कडाडल्या, यूपी पोलिसांनाच दिले कायद्याचे धडे

UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.