AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या लाटेचा विचार करुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त बेड, औषधे, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांवर भर : अजित पवार

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने प्रशासनाला सूचना केल्यात.

तिसऱ्या लाटेचा विचार करुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त बेड, औषधे, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांवर भर : अजित पवार
Ajit Pawar
| Updated on: May 14, 2021 | 5:00 PM
Share

पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने प्रशासनाला सूचना केल्यात. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी आज (14 मे 2021) पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकही घेतली.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते म्हणाले, “कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे.”

‘म्युकर मायकोसिस’च्या औषधांच्या पुरवठ्यात गैरप्रकार होऊ नये : अजित पवार

“ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. ‘म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे,” अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

“पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण”

“ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात 44 ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येकी 2 असे एकूण 4 ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत. अन्य ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत,” अशा सूचना त्यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी नमूद केलं.

“तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण करा”

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या आठवड्यात रुग्णदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण होण्यासाठी कार्यवाही करा. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमिडिसिव्हीर इंजेक्शन तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषध साठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषध साठा, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना नियंत्रणासाठी ‘ब्रेक द चेन’ च्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावं : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “कोरोना नियंत्रणासाठी ‘ब्रेक द चेन’ च्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायला हवे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी.” खासदार गिरीश बापट यांनी देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्य नियोजन होणे आवश्यक असल्याचं म्हटलंय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होतील, ही शक्यता पाहून नियोजन करणे गरजेचे आहे.

“कोविड -19 च्या नव्या स्ट्रेनच्या नियंत्रणासाठी उपाययोजना”

डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास आवश्यक त्या वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण करणे आवश्यक आहेत. कोविड -19 च्या नव्या स्ट्रेनच्या नियंत्रणासाठी व म्युकर मायकोसिससाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्सने पाहणी केली असून उपाययोजना करण्यात येत आहेत.”

पुणे जिल्ह्यातील नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी, सद्यस्थिती व पारदर्शक पद्धतीने वाटप तसेच पुणे जिल्ह्याचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

“नियमांचे पालन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जनजागृती”

भूजल सर्वेक्षण यंत्रणा विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, “कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वतःहून निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शक सूचना, त्रिसूत्रीचे पालन, अन्य आवश्यक नियमांचे पालन, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहार पद्धती आदी विषयी जनजागृतीवर करण्यात भर देण्यात येत आहे.”

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं; चंद्रकांत पाटलांचा दम

VIDEO: जयंत पाटील शांत स्वभावाचे, मीच तापट; कुंटे-पाटील वादात तथ्य नाही: अजित पवार

VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

व्हिडीओ पाहा :

Maharashtra deputy CM Ajit Pawar say we are preparing for corona third wave

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.