Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
FYJC CET 2021 | सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.
पुणे: अकरावीच्या सीईटीसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने पहिल्यांदाचा अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.सीईटी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास प्रिया शिंदे यांच्याशी 9689192899 तर संगीता शिंदे यांच्याशी 8888339530 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.
परीक्षेचा तपशील
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले की, एफवायजेसी सीईटी 2021 यंदा 21 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल. 20 जुलै रोजी अर्थात आज परीक्षा फॉर्म जाहीर केला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाणार आहे. राज्य मंडळाशी संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी लागू असेल आणि शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली बोर्ड किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येईल.
यावर्षीचा दहावीचा निकाल
– यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यभरात 957 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. – 90% पेक्षा जास्त टक्के मिळवणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत. – 1,28,174 विद्यार्थ्यांनी 85 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवले आहेत. – तसेच 80 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत.
संबंधित बातम्या:
Scholarship Examination : 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?
ठाकरे सरकारकडून MAHA TET परीक्षेची घोषणा, संपूर्ण प्रक्रिया कशी असेल? वाचा सविस्तर