शाळाबाह्य आणि स्थलांतरित मजूरांच्या मुलांचा शोध घ्या, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा, सरकारचे आदेश
राज्यात शाळाबाह्य आणि स्थलांतरित मजूरांच्या मुलांचा शोध घेतला जाणार आहे. या शोधमोहीमेतून शाळाबाह्य मुलांची पटावर नोंदणी केली जाणार आहे (Search for out-of-school children).
पुणे : राज्यात शाळाबाह्य आणि स्थलांतरित मजूरांच्या मुलांचा शोध घेतला जाणार आहे (Search for out-of-school children). या शोधमोहीमेतून शाळाबाह्य मुलांची पटावर नोंदणी केली जाणार आहे. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे (Search for out-of-school children).
या शोध मोहीमेसाठी 11 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच 25 फेब्रुवारीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. येत्या 19 मार्चपर्यंत या मुलांची पटावर नोंदणी करुन शाळेत भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
24 मार्चपर्यंत राज्याच्या शिक्षण उपसंचालकांना माहिती द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातही शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीमेला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.
शोध मोहिमेचा उद्देश काय?
कोव्हिड-19 संसर्ग कालावधीत एनक कुटुंबांचे स्थलांतर झालेले असून 6 ते 18 वयोगटातील अनेक मुलं शाळाबाद्य जाल्याचे दिसून येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सदरची शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
शोध मोहीम कुठे केली जाणार?
प्रत्येक गावात आणि शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बसस्थानकं, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळ घर, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखामी, मोठी बांधकामं, स्थलांतरीत कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवर/रेल्वेमध्ये फुले आणि इतर वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भिक मागणारी मुलं, लोककलावंताची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, तेंदूपत्ता, वेचणारी, विड्या वळणारी इत्यादी विविध ठिकाणी काम करणारी बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालके, मागास, वंचित गटातील आणि अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुलं यांची माहिती या शोध मोहिमेत घेण्यात येणार आहे.
लातुरात 45 विद्यार्थ्यांना कोरोना, शाळा दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचनाhttps://t.co/xkuKFd1Qno #Latur
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021
Search for out-of-school children
संबंधित बातम्या :
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ; पण पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार
‘त्या’ शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार- वर्षा गायकवाड
औरंगाबादमध्ये शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश