Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये रंगणार फायनल, कोण मारणार मैदान
शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे कुस्ती शौकिनांचं लक्ष लागलेलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख आणि गतविजेता शिवराज राक्षे यांच्यात यंदाची फायनल होणार आहे. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे कुस्ती शौकिनांचं लक्ष लागलेलं आहे. पुण्यातील फुलगाव येथे यंदाची 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. सेमी फायनलनमध्ये शिवराज राक्षे याने हर्षद कोकाटे याचा पराभव करत फायनल गाठली होती. तर सेमी फायनलमध्ये माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेचा 10-0 पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.
सिकंदर शेख याचा मागच्या केसरी स्पर्धेमध्ये पराभव झाला होता. यंदा त्याच्याकडे नामी संधी आहे मात्र त्याच्यापुढे शिवराज राक्षे याचं आव्हान असणार आहे. दोघेही चपळचिते असून बलदंड शरीरयष्टच्या शिवराजसमोर सिंकदर कोणते डाव टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवराज राक्षे याने मागील वर्षी महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरलं होतं.