Maharashtra Kesari 2023 Winner : सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

Maharashtra Kesari Final 2023 : अखेर चपळ चिता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे.

Maharashtra Kesari 2023 Winner : सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान
Sikander shaikh Winner Maharashtra Kesari 2023
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 8:27 PM

पुणे : महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही आपला सराव सुरू ठेवला आणि यंदा मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत विजयश्री मिळवला.

माती विभागामध्ये झालेल्या सेमी फायलनमध्येही सिकंदर याने संदीप मोटे याचा 10-0 ने पराभव करत एकतर्फी विजय मिळवत फायनल गाठली होती. तर गादी विभागामध्ये शिवराज राक्षे याने हर्षद उर्फ माऊी कोकाटे याला 13-2 ने पराभूत करत फायनल गाठली होती. दोघेही मोठे मल्ल, बलदंड शरीरयष्टीचा शिवराज आणि चपळ चिता असलेला सिकंदर यांच्यात डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कुस्तीची अपेक्षा सर्वांना होती. मात्र सिकंदरने सुरूवातीला झोळी डाव टाकत अवघ्या काही सेकंदातच मैदान मारलं.

सिकंदरच्या काकांची प्रतिक्रिया

सिकंदर शेख मागच्या वेळेसच महाराष्ट्र केसरी झाला असता. पण आता सिकंदरचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. सिकंदर आता सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुढची वाटचाल करणार आहे. आम्ही सगळे भाऊ त्याची तयारी करून घेतोय, अशी प्रतिक्रिया सिकंदर शेख याचे काका शापी शेख यांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.