Maharashtra Lockdown: ‘सरकारला लॉकडाऊन करताना आनंद होत असेल का?’ नाना पाटेकरांचा आर्त सवाल

सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा आहेत. | Nana Patekar Maharashtra Lockdown

Maharashtra Lockdown: 'सरकारला लॉकडाऊन करताना आनंद होत असेल का?' नाना पाटेकरांचा आर्त सवाल
नाना पाटेकर, अभिनेता
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 7:39 AM

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा (Maharashtr Lockown) निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे नाना पाटेकर यांनी म्हटले. (Bollywood actor Nana Patekar on Lockdown in Maharashtra)

ते सोमवारी पुण्यातील रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांना राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येकाने या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘सरकारनं लॉकडाऊन लावण्यापूर्वी काही जबाबदारी घ्यायला पाहिजे का?’

राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यास हातावर पोट असलेले मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर झाले पाहिजे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. याविषयी नाना पाटकेर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा आहेत. ते त्यांच्या परीने मदत करतच राहणार आहेत. पण आपण मी, तू सर्वांनी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकाने 100 लोकांची नव्हे, तर एक-दोन अशा लोकांची जबाबदारी घेण्यासाठी या कठीण काळात पुढं आलं पाहिजे. आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की, अशा कठीण काळात कोणासाठी तरी काही करू शकतो, असे नाना पाटकेर यांनी म्हटले.

महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्यात आला होता. या लॉकडाऊनंतर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

राजकारणात येण्याची मला ऑफर होती, पण… : नाना पाटेकर

मुंबईत लॉकडाऊन झाला तर काय होणार?; तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे का?

(Bollywood actor Nana Patekar on Lockdown in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.