Cow Milk Rates | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 29 रुपये दूध दर देण्याचा निर्णय घेतलाय. Cow milk rates increased

Cow Milk Rates | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाईच्या दूध खरेदी दरात वाढ
गाईच्या दूध खरेदी दरात वाढ
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:10 AM

पुणे: राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय पुणे येथे पार पडली. राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघाद्वारे केल्या जाणाऱ्या गाईच्या दूध खरेदीमध्ये 2 रुपयांची वाढ (Cow Milk rate increased) करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध संघाच्या निर्ण्यामुळे गायीच्या दुधाला लिटरमागे 29 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. दूध खरेदी दरवाढ करत असतानाच विक्रीच्या दरामध्ये कोणतीही वाढ केली नसल्याची माहिती, संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली. (Maharashtra Milk Producer and Processor Business Welfare Association increased Cow Milk rate by two ruppes per liter )

15 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी

पुणे येथील कात्रज दूध संघामध्ये राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघामध्ये बैठक झाली. त्या बैठकीत गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयाची अंमबलबाजवणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. याचा राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कमी दरानं खरेदी करणाऱ्या संघाना दरवाढ करावी लागणार

कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनचं कारण देत अनेक दूध संघानी गाईच्या दूध खरेदी दरात कपात केली होती. त्यामुळे राज्यातील दूध खरेदी दरात वाढ व्हावी म्हणून शेतकरी संघटनांनी आंदोलन देखील केलं होते. राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. आता जे दूधसंघ 29 रुपयांपेक्षा कमी दरानं खरेदी करत आहेत. त्यांना दरवाढ करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकहिताचाही विचार

गाईच्या दूधाचा खरेदी दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची सोमवार(15 फेब्रुवारीपासून) अमंबलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यावेळी दूध ग्राहकांवर देखील आर्थिक भार पडू नये, यासाठी दूध विक्री दरात वाढ करण्यात येणार नाही.

गतवर्षीही दूध खरेदी दरात वाढ, लॉकडाऊनमध्ये घट

राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या 2020 मध्ये झालेल्या बैठकीत गाईच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी दर 29 रुपयांवरुन 31 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. मात्र, कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह दूध संघ देखील अडचणीत आले होते. दूध संकलन आणि विक्री यावर देखील परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे दूध संघांकडून दूध खरेदी दर कमी करण्यात आले होते.

दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनांचं आंदोलन

लॉकडाऊनमुळे दूध संघांकडून कमी दरानं दूध खरेदी होत असल्यानं राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अतिरिक्त ठरणारं दूध खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

दूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात दररोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करणार

(Maharashtra Milk Producer and Processor Business Welfare Association increased Cow Milk rate by two rupees per liter)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.