AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant More left group… भोंग्यावरुन बोंबाबोंब! पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी WhatsApp ग्रुप सोडला

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत धूसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याची माहिती देण्यात आली आहे.

Vasant More left group... भोंग्यावरुन बोंबाबोंब! पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी WhatsApp ग्रुप सोडला
Raj Thackeray & Vasant MoreImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 11:43 AM
Share

पुणे : मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढताना दिसत आहे. डॅशिंग नगरसेवक अशी ओळख असलेले मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही (WhatsApp Group) मोरेंनी सोडल्याचा दावा केला जात आहे. पक्षसंघटनासाठी बनवलेल्या ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. अखेर चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडणं पसंत केलं. एका उपविभाग प्रमुखाच्या पोस्टवरुन ग्रुपमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर मोरेंनी ग्रुप सोडला आणि सिंहासनावर बसलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केला.

पुण्याचे मनसे पदाधिकारी मुंबईत

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत धूसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाण्यातील सभेच्या तयारीच्या अनुषंगाने बोलवण्यात आल्याचं बोललं जात आहे.मात्र पुण्यातील नाराजीसंदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याची शक्यता आहे. परंतु वसंत मोरेंना कोणताही निरोप देण्यात आलेला नाही.

मुस्लिम पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्याविरोधात एल्गार केला होता. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात दिसू लागले आहेत. पुण्यातल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विकासाच्या ब्लू प्रिंटवरुन थेट भोंगे हटवण्यापर्यंत भूमिका का बदलली, असा प्रश्न मनसेचे काही पदाधिकारी विचारत आहेत. वसंत मोरेंनी तर थेट त्यांच्या प्रभागात हनुमान चालिसा लाऊड स्पीकरवर लावणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे पक्षादेश झुगारुन लावला आहे.

वसंत मोरेंची अडचण काय?

कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीनं मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठीशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत आणि हीच मतं गेमचेंजर ठरतात. त्यामुळे वसंत मोरेंची अडचण झाल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

वसंत मोरेंना राज ठाकरेंचं बोलावणं, ‘शिवतीर्थ’वर बैठक; नाराजी दूर होणार?

NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…

राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करतायत? राज ठाकरेंचे भोंगे लावायला विरोध ते आज मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट, चर्चा तर होणारच

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.