Rain : सप्टेंबर महिन्यात कसा असणार पाऊस, आयएमडीने दिले अपडेट

Maharashtra Rain : राज्यातील सर्वच भागांत गेल्या तीन, चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आता हवामान विभागाकडून आणखी एक चांगली बातमी आली आहे. या महिन्यात कसा असणार पाऊस...

Rain : सप्टेंबर महिन्यात कसा असणार पाऊस, आयएमडीने दिले अपडेट
बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात जलसाठा वाढला आहे.Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 12:44 PM

पुणे | 10 सप्टेंबर 2023 : राज्यात महिन्याभरानंतर सर्वत्र पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरु आहे. नाशिकमध्ये यंदा प्रथमच गोदावरी नदीला पूर झाला. या पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात दहा टक्के वाढ झाली आहे. आता पावसाचा हा जोर किती दिवस कायम राहणार आहे? यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे.

किती दिवस असणार पाऊस

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होत आहे. राज्यात पावसाचा हा जोर अजून कायम राहणार आहे. १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. तसेच आगामी चार आठवडे पाऊस कायम असणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुटीवर असलेला पाऊस आपली सरासरी पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

आता कुठे मिळाला अलर्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईला यलो अलर्ट असला तरी ठाणे जिल्ह्याला कोणताही अलर्ट दिला नाही. मध्ये महाराष्ट्रातील नगर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह कोकणातही यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, जालना या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिला नाही. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस

राज्यात बऱ्याच कालावधीनंतर पाऊस सुरू आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरी, पूर्णा आणि दुधना या प्रमुख नद्या अद्याप कोरड्या आहेत. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात 30 टक्के जलसाठा झाला आहे. मागच्या आठवड्यात या धरणात फक्त 20 टक्के जलसाठा होता.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.