Maharashtra School Reopen : सुरक्षितपणे शाळा कशी सुरु करायची? टास्क फोर्स मार्गदर्शन करणार, वेबिनार कुठं पाहायचं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होत आहेत. तर, ग्रामीण भागातील शाळांमध्ये 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत.
पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होत आहेत. तर, ग्रामीण भागातील शाळांमध्ये 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा देखील 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीर राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु व्हाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भाट ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
दुपारी 4 वाजता वेबिनार
सोमवारी 4 ऑक्टोबरला शाळा सुरु होत आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांच्या संयुक्त विद्यमानं ऑनलाईन वेबिनार होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, शिक्षण विभागाचे सचिव, टास्क फोर्सचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 4 वाजता ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. वेबिनारमध्ये शाळांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत टास्क फोर्स मार्गदर्शन करणार आहे. वेबिनार SCERT च्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.
येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत आज दु.४ वा.वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. खालील लिंकद्वारे आपणही सहभागी होऊ शकता.https://t.co/e3OH9PWUqO pic.twitter.com/KPydFWwa6L
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 1, 2021
ग्रामीण भागात 5 ते 12 वी तर शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु
टास्क फोर्सकडून नव्या सूचना मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.
पालकांची समंती महत्त्वाची
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या:
Maharashtra School Reopen Education Department and Task Force conduct webinar for secure school reopen