महाराष्ट्राचा इथेनॉलनिर्मितीमध्ये देशात झेंडा, 1012 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण, साखर आयुक्तांची माहिती
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रानं इथेनॉल निर्मितीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्याचं सांगितलं. Shekhar Gaikwad Sugarcane Cutting Season
पुणे: महाराष्ट्रातील 2020-21 चा ऊस गाळप हंगाम संपल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 93 टक्के एफआरपी पेमेंट करण्यात आले आहे. 19 साखर कारखान्यांनी तैवानला ऑक्सिजन प्लॅन्टची ऑर्डर दिली आहे, लवकरच ते बसवले जाणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. (Maharashtra Sugar Commissioner Shekhar Gaikwad said Sugarcane cutting season competed of 2020-21)
189 साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम
सन 2020-21 मध्ये एकूण सहकारी आणि खासगी अशा मिळून एकूण 189 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. महाराष्ट्राची गाळप क्षमता 76 हजार टनानं वाढली असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. मागील वर्षी महाराष्ट्रात 36 लाख टन शिल्लक होती. यावर्षी 106 लाख साखरेचं उत्पन्न झाले आहे.
इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
शेखर गायकवाड यांनी इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याची माहिती दिली.गेल्या पाच वर्षात इथोनॉलच उत्पन्न झालं नाही ते यावर्षी झालं आहे, असंही ते म्हणाले.
पावसाळ्यापूर्वी राज्यातील ऊसाचं गाळप पूर्ण
महाराष्ट्रातील एकूण 189 साखर कारखान्याद्वारे 1012 लाख टन यावर्षी गाळप झाले आहे. 140 दिवसांचा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. पावसाळा येण्यापूर्वी राज्यातला सर्व ऊस संपला आहे.
थकित एफआरपीप्रकरणी 29 कारखान्यांवर कारवाई
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रातील एकूण 29 कारखान्यांवर थकित एफआरपी प्रकरणी कारवाई केल्याची माहिती दिली. तर, दुसरीकडे थकीत एफआरपीप्रकरणी अजून 10 कारखान्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
DAP खतांवरील सबसिडी गेमचेंजर ठरणार? शेतकरी मोदी सरकारवर खुश होतील?https://t.co/Q9gczuPTt3#Farmer | #fertilizersubsidy | #Fertilizer | #ModiGovernment
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2021
सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात
यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले असून साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण 12 टक्के इतके आहे. तर, पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून सरासरी साखर उतारा 10.97 टक्के इतका आहे. तर सर्वात कमी उतारा नागपूर विभागात राहिला आहे.
कोरोनाच्या संकटातही विक्रमी गाळप
2020-21 चा गाळप हंगाम हा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु झाला. राज्यातील शेतकऱ्यांची मेहनत, साखर कारखान्यांची यंत्रणा याद्वारे राज्यामध्ये कोरोनाचं संकट असतानाही विक्रमी गाळप झालं आहे. यानिमित्तानं महाराष्ट्र हे साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या:
कोरोना संकटात ना शेतकरी थांबला ना कारखाने, यंदाच्या गाळप हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप
(Maharashtra Sugar Commissioner Shekhar Gaikwad said Sugarcane cutting season competed of 2020-21)