AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मावळमध्ये राजकीय धुराळा, निवडणूक सर्वात रंजक होण्याची चिन्हं, पडद्यामागे काय घडतंय?

मावळ लोकसभेत महायुतीचे तिन्ही पक्ष दावा सांगताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेते प्रवेश केलाय. काय आहे मावळ लोकसभेचं चित्र, 2019 नंतर मावळात किती गणितं बदलली आहेत, आणि किती गणितं नव्यानं जुळलीयत, याबाबत सविस्तर माहिती सांगणारा रिपोर्ट!

मावळमध्ये राजकीय धुराळा, निवडणूक सर्वात रंजक होण्याची चिन्हं, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 10:45 PM

रणजित जाधव | 30 डिसेंबर 2023 : मावळ लोकसभेची जागा यंदा सर्वाधिक रंजक होण्याची चिन्हं आहेत. कारण जागा एक आहे, आणि महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी दावा सांगितलाय. आणि त्यात अजित पवार गटाच्या संजोग वाघेरेंनी ठाकरे गटात प्रवेश करत मावळसाठी तयारी सुरु केलीय. 2019 मध्ये मावळच्या जागेकडे सर्वांचं लक्ष होतं, कारण शिवसेनेचे श्रीरंग बारणेंविरोधात अजित पवारांचे पूत्र पार्थ पवारांमध्ये लढाई होती. आता समीकरणं बदललीयत, पण याच बदललेल्या समीकरणांनी अजून गुंता वाढवलाय. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, त्यांचा जागेवर दावा कायम आहे. दुसरीकडे भाजपच्या बाळा भेगडेंनी फ्लेक्द्वारे लोकसभा तिकीटाची आशा वर्तवलीय आणि अजित पवार गटाच्या सुनिल शेळकेंनी पार्थ पवारांसाठी मैदानात उतरण्याचं म्हटलंय.

शिरुरमधून अमोल कोल्हेंना पाडणारच, असं चँलेज अजित पवारांनी दिलं. त्यावर आधी अजित पवारांनी त्यांचा पूत्र पार्थ पवारांना मावळातून जिंकून दाखवावं, असं प्रतिआव्हान शरद पवार गटानं दिलंय. हेच आव्हान याआधी शिवसेनेचे विजय शिवतारेही अजित पवारांना देत होते. मात्र आता समीकरण बदलल्यामुळे वेळ पडली तर आम्ही पार्थ पवारांचाही प्रचार करु असं शिवतारेंनी म्हटलंय. त्यात आता अजित पवार गटाचे संजोग वाघेरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं मावळची निवडणूक अजून रंजक होणार आहे.

मावळ लोकसभेचा इतिहास काय?

2014 मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणेंविरोधात शेकाप-मनसेचे उमेदवार लक्ष्मण जगताप लढले होते. बारणेंना 5 लाख 12 हजार 226 मतं मिळाली. जगताप 1 लाख 57 हजार मतांनी पराभूत झाले. तेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या राहुल नार्वेकरांना अवघी 1 लाख 82 हजार 293 मतं पडली. 2019 ला शिवसेनेच्या बारणेंविरोधात तेव्हा राष्ट्रवादीचे पार्थ पवार उभे राहिले. बारणेंना 7 लाख 20 हजार 663 मतं मिळाली, तर पार्थ पवार 2 लाख 15 हजारांनी पराभूत झाले.

मावळ लोकसभेत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल या 6 विधानसभा येतात. सध्या पिंपरी, मावळात अजित पवार गटाचे आमदार आहेत. चिंचवड-पनवेलमध्ये भाजपचे आमदार, कर्जतमध्ये शिंदे गटाचे, तर उरणमध्ये अपक्ष आमदार आहेत. मात्र 2024 च्या समीकरणांनी पहिल्यांदाच अनेक लढती रंजक होणारायत. कारण मावळातून दोन वेळा खासदार राहिलेल्या श्रीरंग बारणेंच्या शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. गेल्यावेळी लढलेल्या पार्थ पवारांची राष्ट्रवादीही दोन गटात विभागली गेलीय. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत मविआत आहेत, तर शिंदे-फडणवीसांसोबत अजित पवार महायुतीत गेले आहेत.

पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.