Pune CBI | मणिपूर हत्याकांड प्रकरणात पुणे कनेक्शन, ‘मास्टरमाइंड’पर्यंत पोहचले सीबीआय

manipur students murder case | मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे अधिकारी पुणे शहरात आले. या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर कारवाई झाली.

Pune CBI | मणिपूर हत्याकांड प्रकरणात पुणे कनेक्शन, 'मास्टरमाइंड'पर्यंत पोहचले सीबीआय
cbiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 7:48 AM

पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. सप्टेंबर महिन्यात मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांची हत्या झाली होती. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर देशभरात खळबळ माजली होती. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला. आता सीबीआय या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ पर्यंत पोहचले. या प्रकरणात त्या आरोपीचे पुणे कनेक्शन समोर आले.

काय केली सीबीआयने कारवाई

मणिपूर हत्याकांड प्रकरणीत CBI कडून गेल्या काही दिवसांपासून आरोपींचा शोध सुरु होता. या प्रकरणातील आरोपींनी मणिपूरमधील 17 वर्षीय विद्यार्थी हिजाम लिनथोइंगंबी आणि 20 वर्षांचा फिजाम हेमजीत यांचे अपहरण केले होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी त्यांची हत्या झाल्याचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर चार आरोपींना अटक केली होती. पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकिप आणि दोन महिला लिंग्नेइचोन बैतेकुकी आणि टिननेइलिंग हेन्थांग यांना एक ऑक्टोंबर रोजी अटक केली होती. परंतु मास्टरमाइंड फरार होता.

अखेर ‘मास्टरमाइंड’ला पकडले पुण्यात

मणिपूरमधील दोन तरुणांचे अपहरण करत हत्या केल्या प्रकरणी CBI कडून ‘मास्टरमाइंड’ ला अटक केली. पुणे येथे येऊन त्या व्यक्तीला सीबीआयने अटक केली. पुण्यातून 11 ऑक्टोबर रोजी सीबीआयने त्याला पकडले होते. 22 वर्षीय पाओलुनमांग याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबरपर्यंत सीबीआयची कोठडी दिली. मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्याकांड प्रकरणाचा त्याचावर आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

पाओलुनमांग पुण्यात लपला होता…

पाओलुनमांग गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात लपून बसल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर सीबीआयचे पथक पुणे शहरात दाखल झाले. त्याला अटक करुन दिल्लीत नेले. न्यायालयाने त्याला सीबीआय कोठडी दिली. पाओलुनमांग याला पुण्यातून कोणी मदत केली का? याचाही शोध सीबीआय घेणार आहे. आरोपीच्या सीबीआय कोठडीतून ही माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.