.. तिकडे सभा घेतली की चांगला रिझल्ट आलाय, दूरदृष्टी ठेवली सभासदांच्या हिताचे निर्णय होतात – उपमुख्यमंत्री अजित पवार
युक्रेन- रशिया युद्धामुळे इंधन दरात सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल दर रोजच वाढतायत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या वाढवायच्या आहेत. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने आणत आहेत. त्यामुळे 5 हजार चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा मानस असल्याचे अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवले.
नविद पठाण , बारामती – या परिसरातील सहकाऱ्यांनी विविध संस्था काढल्या. काहींना यश आलं.. काहींना अपयश आलं. अनेक संस्थांनी ठेवीच संपवल्या आणि सभासदांचा विश्वासघात केला. भुदरगड संस्थेची परिस्थिती आपण पाहिलीय. ज्यांनी तिथे पैसे गुंतवले ते आता दररोज संबंधितांच्या नावाने खडे फोडत असतील. पूर्वी 250 ते300 रुपये स्क्वेअर फूट दराने बांधकाम व्हायचं. आता दीड हजारांच्यावर लागतायत. कोणत्याही कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरेल असं मंगल कार्यालय समता पतसंस्थेनं उभारलं. दूरदृष्टी ठेवली की अशा प्रकारे सभासदांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होतात. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. बारामतीतील समता पॅलेस मंगल कार्यालयाचा(Mamta Palace )उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या पत्नी बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार(Sunetra Pawar,), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप ही कार्यक्रमास उपस्थित होते.
5 हजार चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा मानस
युक्रेन- रशिया युद्धामुळे इंधन दरात सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल दर रोजच वाढतायत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या वाढवायच्या आहेत. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने आणत आहेत. त्यामुळे 5 हजार चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा मानस असल्याचे अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवले. पेट्रोल पंपातून खूप नफा होतो असं म्हणतात. पण तसं नाही.. कारण माझाही पंप.. फक्त लोकांची सोय होतेय. हे समाधान असतं. मंगल कार्यालयाबाहेर पेव्हर का नाहीत टाकले. लवकर उद्घाटन केलं तारीख मिळत नाही म्हणून आजच उदघाटन घेतलं. आर. एन. शिंदे यांच्या कार्यालयाचा गुण चांगलाय. तिकडे सभा घेतली की चांगला रिझल्ट आलाय. त्यामुळे याही हॉलमधून आम्हाला चांगले निकाल मिळतील असं वाटतय. तो हॉल आम्हाला असंच देतात. तुम्ही काही शुल्क आकारणार असाल तर. तसंच देणार असाल तर घेतो. दरवर्षी या कार्यालयात गरीब वर्गासाठी सामूहिक विवाह सोहळा घ्या. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्व ऊस गळीत होईपर्यंत कारखाने बंद होवू द्यायचे नाहीत
निरा डावा आणि उजवा कालवा जूनपर्यंत बंद होणार नाही, याचा निर्णय घेतला आहे. उसाला पाणी देत बसू नका. 50 हजार एकदाच मिळणार आहेत. नाहीतर पुन्हा विचाराल अजून काही आहे का नाही? महाराष्ट्रातील सर्व ऊस गळीत होईपर्यंत कारखाने बंद होवू द्यायचे नाहीत. आपल्या राज्यातील ऊस वेळेतच गळीताला गेला पाहिजे. बारामतीत 14 खासदार आलेत. विकासकामे होताना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील सर्व ज्ञान उपलब्ध करुन दिलंय जिथं पिकतं तिथं विकत नाही. कृषी विज्ञान केंद्रात अनेक प्रयोग होतायत. जरा जाऊन बघा. बारामतीसह परिसरातील शेतकऱ्यांना फायदा.
दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न
सांगलीतील शाळा चांगल्या झाल्यात. पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सीईओलाच घेवून बसणार जिल्हा नियोजन समितीतून अनेक जिल्हा परिषद शाळांची कामे करणार, जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलणार आहे. गावात गप्पा हाणण्यापेक्षा जरा गावातल्या शाळाही बघा. आता मी गावातली शाळा नीट आहे का तेच बघणार. महाविकास आघाडीची दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक ओढाताण झाली. कोरोना संपला नाही. आम्ही लावलाय. इथे मास्क नसणारांचीच संख्या जास्त झालीय. चीनमध्ये परिस्थिती बिघडतेय.. त्यामुळे काळजी घ्या. मी घाबरवत नाही. दक्षता घेण्याचं आवाहन करतोय. माईक आला की सोडवतच नाही.
लेकरासह पत्नीचे प्राण वाचवूनच जीव सोडला, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून पित्याचा मृत्यू
Yashwant Jadhav यांच्याकडून ‘मातोश्री’ला 2 कोटी? जाधव म्हणतात, ती तर माझी आई!