म्हाडाच्या परीक्षेत पुन्हा गैरप्रकार? परीक्षा केंद्रावरील गडबडीचा Video समोर; MPSC समन्वय समितीचा गंभीर आरोप

जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप MPSC समन्वय समितीने केलाय. त्याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आलाय. हा गैरप्रकार औरंगाबादच्या खोडकपुरा भागातील एका शाळेत घडल्याचं बोललं जात आहे.

म्हाडाच्या परीक्षेत पुन्हा गैरप्रकार? परीक्षा केंद्रावरील गडबडीचा Video समोर; MPSC समन्वय समितीचा गंभीर आरोप
म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशयImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:58 PM

पुणे : विविध परीक्षेतील गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमधून मोठी नाराजी व्यक्त होतेय. अशातच म्हाडाच्या परीक्षेत (MHADA Exam) पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप MPSC समन्वय समितीने केलाय. त्याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही (CCTV Video) समोर आलाय. हा गैरप्रकार औरंगाबादच्या खोडकपुरा भागातील एका शाळेत घडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या म्हाडा परीक्षेत घोटाळा असल्याची माहिती मिळताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मध्यरात्री ट्वीट करत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली होती.

MPSC समन्वय समितीने केलेल्या आरोपानुसार औरंगाबाद शहरातील खोकडपुरा भागातील एका शाळेमध्ये केंद्रसंचालकांशी संगनमत करुन परीक्षेच्या संगणकीय प्रणालीत फेरफार करण्यात आला. याबाबत MPSC समन्वय समितीने पुराव्यासह म्हाडाकडे रितसर तक्रारही केली आहे. या तक्रारीवरुन आता TCS कडून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. कंपनीकडून स्पष्टीकरण आल्यानंतर म्हाडा पोलीस तक्रार करण्याबाबत विचार करेल.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

परीक्षा होण्यापूर्वी दोन व्यक्ती परीक्षा केंद्रात प्रवेश करताना एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर एका व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती परीक्षा होणार असलेल्या वर्गात येतात. त्यातील एकजण खुर्चीवर चढून सीसीटीव्हीजवळ काही करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर दोघेजण कम्प्यूटरसमोर बसून काहीतरी करत आहेत. पुढे आधीचीच व्यक्ती पुन्हा एकदा सीसीटीव्हीजवळ येत काही करत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर अजून एका व्हिडीओत परीक्षेवेळीही सुपरवायझर आणि विद्यार्थी गप्पा मारताना दिसून येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या मुलांचा रोल नंबर अन्य ठिकाणी असून त्यांना या सेंटरवर जागा देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय.

म्हाडाच्या 565 रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला. पुढे हा गैरप्रकार टाळण्यासाठी म्हाडाने टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता ऑनलाईन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यानं विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.

इतर बातम्या :  

MPSC : राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेच्या तारखा प्रसिद्ध

‘कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच’, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा, UPA अध्यक्षपदावरुन टोलेबाजी

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.