राज्य दूध उत्पादक संघानंतर सहकारी संघाचाही शेतकऱ्यांना दिलासा, दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Milk purchasing rate increased pune)
पुणे : पुणे (Pune) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाईच्या दूध खरेदी दरात (Milk purchasing rate) प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून (21 फेब्रवारी) होणार आहे. किमान दूधदर वाढीतून शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतण्यात आल्याचं दूध उत्पादक संघांने सांगितलं आहे. (Milk purchasing rate increased by one rupees in Pune)
प्रतिलिटर एक रुपयाने वाढ
लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या व्यवहारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असल्यामुळे दूध विक्रिवर मोठा परिणाम झाला होता. तसेच मागील काही दिवसांपासून इंधन आणि पशुखाद्याच्या दरात वाढ होत आहे. शिवाय दूध उत्पादनातही मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकरी आणि दूध उत्पादकांमध्ये नाजारी पसरली होती. त्यानंतर या घटकांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीकोनातून दूध खऱेदी दरात वाढ करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. या मागणीची दखल घेत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाईच्या दूध खरेदी दरात एका रुपयाने वाढ केली आहे. संघाच्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 21 फेब्रुवारीपासून होणार आहे.
शेतकऱ्याला किमान दूध दरवाढीतून थोडीशी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने स्पष्टीकरण दिलं आहे.
कल्याणकारी संघाकडून 2 रुपयांची वाढ
यापूर्वी 14 फेब्रुवारी रोजी राज्य दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक पुणे येथे पार पडली होती. यावेळी राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघाद्वारे केल्या जाणाऱ्या गाईच्या दूध खरेदीमध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दूध खरेदी दरवाढ करत असतानाच विक्रीच्या दरामध्ये कोणतीही वाढ केली नसल्याची माहिती, यावेळी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली होती.
Mumbai Corona update | मुंबईला कोरोनाचा विळखा, 823 नवे रुग्ण; चेंबूरमधील 4 इमारती सीलhttps://t.co/FJoM5GxDSs#Mumbai | #MumbaiCorona | #Dharavi | #corona | #CoronavirusVaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
इतर बातम्या :