MNS | राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्नचं नाही, साईनाथ बाबर यांनी चर्चा फेटाळल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला दादर येथील शिवाजी पार्कवरील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला दादर येथील शिवाजी पार्कवरील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यानंतर मनसेच्यावतीनं मुंबई, कल्याण डोंबिवली आणि नाशिक येथे हनुमान चालिसा लावण्यात आली होती तर पुण्यातील (Pune) हनुमान चालिसा लावण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या भाषणातील भूमिकेमुळं पुण्यातील मनसेचे नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पुण्यातील मनसेचे नगरसवेक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर (Sainath Babar) नाराज असल्याच्या बातम्या काल प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र त्यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आज मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. नाराज असण्याचा प्रश्न नाही, असं त्यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय
मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी नाराजीच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. मी नाराज नाही, नाराज असण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया साईनाथ बाबर यांनी टीव्ही 9 मराठीकडे दिली आहे. साईनाथ बाबर नाराज असल्याची शहरभर चर्चा होती. या चर्चेचं साईनाथ बाबर यांच्याकडून खंडन करण्यात आलं असून मी पक्षावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांची अडचण झाल्याच्या पुण्यात चर्चा
राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात मुस्लिम मतांची संख्या जास्त असल्यामुळे अडचण निर्माण झाल्याची चर्चा सुरु होती. काल दोन्ही पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला होता. आज होणाऱ्या शहर मनसेच्या बैठकीत याचे पडसाद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेत राजीनामा सत्र
राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर माजिद शेखनंतर यांनी शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला आहे. शेहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे ते राजीनामा देत असल्याची माहिती समोर आलीय. मनसेतील आणखी काही मुस्लिम पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. मशिदीवरील भोंगे व मदरशाबाबत राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय. आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या ,आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली.16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं, अशा प्रकारची मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांची भावनिक पोस्ट व्हायरल झाली होती.
इतर बातम्या:
ST Strike : एसटी महामंडळाची कंत्राटी पद्धतीने भरती सुरू, आत्तापर्यंत 52 जणांना केलं नियुक्त