पुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा
या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. (MNS Raj Thackeray Two Days Visit In Pune)
मुंबई : पुण्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. (MNS Raj Thackeray Two Days Visit In Pune)
राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मनसे नेते बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे उपस्थित होते. येत्या पुणे महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एकूण 45 मिनिटं चर्चा झाली.
राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवार होणारी बैठक शुक्रवारी 29 जानेवारीला होईल, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट होती का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भाजप-मनसेची जवळीक
दरम्यान, शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर, भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य (BJP’s Slogan BMC election) जाहीर केलं आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचं उद्घाटन केलं आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. (MNS Raj Thackeray Two Days Visit In Pune)
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु