Modi In Pune Live : सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये प्राचीन भारताचा वारसा जपला जातोय : नरेंद्र मोदी

| Updated on: Mar 06, 2022 | 3:46 PM

Modi In Pune: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौ-यावर आहेत, पुण्यात ते अनेक ठिकाणांना भेट देतील, त्याचबरोबर त्यांच्या हस्ते अनेक कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Modi In Pune Live : सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये प्राचीन भारताचा वारसा जपला जातोय : नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

मुंबई : आज रविवार 6 मार्च 2022. पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तास पुण्यात असणार आहेत.  सकाळी 10 वाजता त्यांच्या कार्यक्रमाला सुरूवात होईल. पाच तासात खालीलप्रमाणे कार्यक्रम असतील.

मोदींचं मिशन पुणे..

1. मोदी आज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत पुण्यात

2. सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन

3. सकाळी 11 वाजता पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण

4. सकाळी 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन, गरवारे स्टेशन (पंतप्रधान मेट्रोने प्रवास करणार)

5. 12 वाजता एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन, त्यानंतर जाहीर सभा

6. 1.45 वाजता, सिम्बाय़सिस, आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन

7. 3 वाजता पुण्याहून रवाना होणार

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Mar 2022 02:38 PM (IST)

    देशातील सरकार युवकांच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवते : नरेंद्र मोदी

    आज आपला देश सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये

    जगातील सर्वात मोठं स्टार्ट अप हब भारतात

    स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया, आत्मनिर्भर भारत तुम्हाला प्रेरित करतोय

    आज भारत वाढतोय, भारत जगावर प्रभाव टाकतोय

    कोरोना लसीच्या संदर्भात संपूर्ण जगासमोर भारतानं सामर्थ्य दाखववं

    यूक्रेन संकटात ऑपरेशन गंगा चालवून भारत आपल्या नागरिकांना युद्ध क्षेत्रातून बाहेर काढत आहे

    जगातील इतर देशांना यामध्ये अडचणी येत आहेत. मात्र, भारताचा प्रभाव आहे आपण हजारो विद्यार्थ्यांना भारतात परत आणू शकलो आहे

    विद्यार्थ्यांनो तुमची पिढी नशीबवान आहे. त्यांना पहिल्या डिफेन्सिव आणि डिपेंडंट मानसिकतेचा सामना करावा लागला नाही

    देशात हा बदल आला त्याचं श्रेय आपल्या सर्वांना जात, युवकांना जातं,

    ज्या क्षेत्रात देश आपल्या पायांवर पुढं जाण्याचा विचार करत नव्हता त्यात भारत ग्लोबल लीडर बनण्याच्या वाटेवर आहे

    काही वर्षांपूर्वी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. आपण आयातीवर अवलंबून होतो

    आज स्थिती बदलली आहे, मोबाईल निर्मितीत भारत जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे.

    7 वर्षांपूर्वी भारतात दोन मोबाईल निर्मिती कंपन्या होत्या, आज दोनशे पेक्षा जास्त उत्पादक युनिट आहेत

    संरक्षण क्षेत्रात सर्वात मोठा आयातदार होतो, आपण आता संरक्षण साहित्याचे निर्यातदार बनत आहोत.

    स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात नव्या संकल्पासह पुढं जात आहोत

    आज  सॉफ्टवेअर क्षेत्र, ए आय, एआर, मशीन लर्निंग या क्षेत्रात नव्या संधी बनत आहेत

    देशात जिओ स्पेशल सिस्टीम, ड्रोन, सेमी कंडक्टर आणि इतर क्षेत्रात बदल होत आहेत

    हे बदल आपल्यासाठी संधी घेऊन आले आहेत

    तुम्ही टेक्निकल, मॅनेजमेंट आणि मेडिकल फिल्ड मध्ये असाल तरी ही संधी निर्माण होतीय ती तुमच्यासाठी आहे.

    देशातील सरकार युवकांच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवते :

  • 06 Mar 2022 02:28 PM (IST)

    सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सिम्बॉयसिसचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

    सिम्बॉयसिसच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो

    आरोग्य धाम केंद्राचं उद्घाटन करण्याचा मान मिळाला

    तुमची शिक्षण संस्था वसुधैव कुटुंबकम या भारताच्या मूळ विचारावर चालते

    तुमच्या शिक्षण संस्थेत वुसधैव कुटुंबकम वर एक अभ्यासक्रम आहे, हे सांगण्यात आलं.

  • 06 Mar 2022 02:16 PM (IST)

    नरेंद्र मोदीजी ग्रामीण भागातील तुमची खूप लोकप्रियता : मुजुमदार

    कोल्हापूर जिल्ह्यातील हरणी बुद्रूक मधून आलोय

    ते  2 हजार लोकसंख्येंचं गाव आहे

    तिथून लोकं तुम्हाला ऐकायला आले आहेत

    ग्रामीण भागातील तुमची लोकप्रियता आहे

    सिम्बॉयसिसचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

    नरेंद्र मोदी मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान आहेत

    नरेंद्र मोदींच्या भेट ही आमच्यासाठी ऐतिहासिक आहे.

    सिम्बॉयसिसमध्ये आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, असं मुजुमदार म्हणाले

    सिम्बॉयसिस ही आयडिया आहे, 50 वर्षापूर्वी माझ्या मनात एक संकल्पना आली

    परकीय आणि भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणलं पाहिजे असं वाटलं

    छोट्या खोलीत सुरु झालेला हा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला

    वसुधैव कुटुंबकम हा आमचा मंत्र आहे

    सिम्बॉयसिसचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम देखील ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले

  • 06 Mar 2022 02:07 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये दाखल

    सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी उपस्थित

    सिम्बॉयसिसच्या प्रमुखांकडून नरेंद्र मोदींचा सत्कार

  • 06 Mar 2022 01:33 PM (IST)

    वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे – मोदी

    सातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार आहेत. मुळामुठेची साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी केंद्र मदत करतंय. नद्या पुन्हा जिवंत झाल्या तर पुणे शहरालाही नवी जान येईल. वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य पूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व कळेल.

    पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टरप्लान बवला आहे. योजनांचा वेळ लागतो कारण वेगवेगळ्या मंत्रालयातील ताळमेळ नसतो. उशिरा होणाऱ्या योजनांचा फटका बसू नये म्हणून पीएम गतीशक्तीमुळे मदत मिळेत. प्रकल्प वेळेत होतील. लोकांची गैरेसोय टळले. देशाचा पैसा वाचेल. आधुनिकतेसोबत पुण्यातील पौराणिकता, महाराष्ट्राच्या गौरवाला आणि शहरविकासालाही महत्त्व दिलं जातंय. संतांचं महत्त्व असलेली ही भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचं उद्घाटनं करण्याची संधी मला मिळाली होती.

  • 06 Mar 2022 01:19 PM (IST)

    आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्यानं तुमच्याच शहराला फायदा होणार..

    आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्यानं तुमच्याच शहराला फायदा होणार..

    २१ व्या शतकातील भारतात आपल्याला आधुनिकही बनवायचं आणि त्याला नव्या सुविधाही जोडजायच्या… भविष्यातील योजना लक्षात घेऊन आपण त्यावर काम करतोय…

    इलेक्ट्रीक बस, कार, इलेक्ट्रीक गाड्या, स्मार्ट मोबिलीटी, प्रत्येक शहरात सर्क्युलर इकोनॉमी बेस्ट मॅनेजमेन्ट सिस्टम.. आधुनिक सिवेज ट्रीटमेन्ट प्लांट, वेस्ट टू वेस्ट गोबर प्लांट, बायोगॅस प्लांट, एनर्जी, एफिशियन्स, पथदिवे एलईडी, या सगळ्या व्हिजनसह आम्ही पुढे जातोय.

    अमृत मिशनला घेऊन अनेक मोहीमा सरकारनं घेतल्या आहेत. रेरासारखा कायदा आम्ही आणला. मध्यमवर्गाला याचा फायदा होतोय. पैसे द्यायचे, पण वर्षानुवर्ष घर मिळत नव्हतं. सामान्यांचे हाल व्हायचे. मध्यमवर्गीयाला घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सुरक्षा मिळावी म्हणून रेराचा कायदा मोठं काम करतोय.

  • 06 Mar 2022 01:13 PM (IST)

    आधी भूमिपुजनं व्हायची, पण माहीत नसायचं की उद्घाटन कधी होणार

    आधी भूमिपुजनं व्हायची, पण माहीत नसायचं की उद्घाटन कधी होणार.. म्हणून आजचं उद्घाटनं जास्त महत्त्वाचं आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण केलेल जाऊ शकतात हे आज सिद्ध झाल्याचं मोदींनी बोलताना सांगितलं. मुळा-मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी ११०० करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. पुण्याला ई-बस मिळाल्या आहेत. आज पुण्यात अनेक विविधतापूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट आर. के. लक्ष्मण यांना समर्पित करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळालाय.

  • 06 Mar 2022 01:06 PM (IST)

    शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा लोकापर्ण करण्याची संधी मिळाली – मोदी

    शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा लोकापर्ण करण्याची संधी मिळाली – मोदी

    बाबासाहेब पुरंदरांचीही मी आठवण काढतोय. शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा लोकापर्ण करण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या मनात सदासर्वदा वसणारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा युवा पिढीत, येणाऱ्या पिढीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवते. आज पुण्याच्या विकासात जोडलेल्या अनेक प्रकल्पांचं भूमिपुजन आणि उद्घाटन झालंय. माझ्य सौभाग्य आहे की पुणे मेट्रेच्या भूमिपुजनासह लोकार्पणसाठीही मला संधी दिलीत.

  • 06 Mar 2022 01:01 PM (IST)

    मोदींनी स्वातंत्र्यसैनिकांना वाहिली आदरांजली

    देशाच्या स्वातंत्र्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलंय. लोकमान्य टिळक, कॅपिटल बंधू, गोपाळ आगरकर, गोपाळकृष्ण देशमुख, आरती भंडारकर, महादेव गोविंद रानडे अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मी आदरांजली वाहतो…

  • 06 Mar 2022 12:57 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला मराठीत सुरूवात

    छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार…

  • 06 Mar 2022 12:46 PM (IST)

    पुण्याची ओळख सायकलं शहरं अशी होती – अजित पवार

    पुण्याची ओळख सायकलं शहरं अशी होती. आज सगळ्यात जास्त मोटार वाहनं पुण्यात आहेत. या वाहनांची किंमत कशी कमी होई, अशी एक विनंती आपल्याला पुणेकरांच्या वतीननं करतोय. अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ही वक्तव्य महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. छत्रपतींना स्वराज्य स्थापलं. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाय. कुणाही बद्दल माझ्यामनात आकस नाही. हेही नम्रपणे नमूक करतो..

  • 06 Mar 2022 12:43 PM (IST)

    पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्याअर्थानं दाद दिली पाहिजे – अजित पवार

    देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजधानी, ऐतिहासिक नगरीत मी मनापासून स्वागत करतो. मोदींच्या हस्ते आज महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन झालंय. अनेक वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती की हे प्रकल्प पूर्ण व्हावेत… हे प्रकल्प पुणे पिंपरीच्या शैक्षणिक सांस्कृतिक विकासात भर घालणारे आहेत.. पालकमंत्री या नात्यानं मोदी उपस्थित राहिले म्हणून त्यांचे आभार मानतो…

    मोदींनी आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी पहिल्यांचा रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची ही भूमी.. राजमाना राष्ट्रमाता जिजाऊंची ही भूमी

    पुणे करांच्या सहनशीलतेला खऱ्याअर्थानं दाद दिली पाहिजे… १२ वर्ष जवळपास पुणे मेट्रोच्या कामाला सुरु करायला लागली… कठोर भूमिका गडकरी साहेबांनी स्वीकारली आणि मेट्रोला कुठेतरी सुरुवात झाली एक गोष्ट मान्य करावी लागले.. पुणे आणि पिंपरी चिंचवड करांना कामावेळी खूप त्रास सहन करावा लागला.. अजूनही काही काळ हा त्रास सहन करावा लागणार.. हे काम आणखी काही वर्ष सुरु राहणार आहेत. एकंदरीत आज स्वतः मोदींनी दहा आणि वीस रुपये तिकीटदर ठेवून सेवा सुरु केलीये..

    मोदींना एक सांगायचंय.. – अंधेरी घाटकोपर मार्गावर पहिली मेट्रो सुरुवात केली…२००६ला २०१४ ला भूमिपुजान.. ऑगस्ट २०१४ ला सुरु झाली… आणि ती मेट्रोल २०१९ ला सुरु झाली.. अजूनही पिंपरी-स्वारगेट जसं सुरु आहे तस स्वारगेट ते कात्रज… हडपसर ते खराडी…. या दोन मार्गिकेचा अहवाल प्रकल्पाचं काम सुरु आहे.. ते काम पूर्ण करुन जसं आताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के राज्य आणि ५० टक्के केंद्राची आहे… आणि १० टक्के मनपाची आहे.. त्याच धर्तीवर मेट्रो सुरु करण्यासाठी मदत आपण केली.. तशीच ही मदतही आम्हाला करावी… आपल्यामुळे गडकरीसाहेबांमुळे नागपूर मुंबई पुणे नाशिक मेट्रो दोनसाठी मदत झाली पाहिजे.. विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपलं सहकार्य मिळावं. यात कोणतंही राजकारण न आणता… सगळ्यांनी एकजुटीनं काम करावं… इतक काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत..

    मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्प, जायका प्रकल्प.. येणाऱ्या काळात सुशोभीकरणाचं काम होईल… मोदींना विश्वास देतो की मुळामुठा नदी शुद्धीकरण जायका प्रकल्प – नदी पात्रातले पाण्याचे स्त्रोत, या सगळ्याचं भान ठेवावं लागणार आहे. यावरही काम

  • 06 Mar 2022 12:36 PM (IST)

    अजित पवारांच्या भाषणाला सुरूवात

    अजित पवारांनी केलं पुणे करांचं कौतुक

    तुमच्या सहशीलतेला दाद देतो

  • 06 Mar 2022 12:30 PM (IST)

    आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस – देवेंद्र फडणवीस

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतींना मानाचा मुजरा बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो.. अखिल भारताचे लाडके आणि खऱ्या अर्थानं वैश्विक नेतृत्त्व असलेले मोदीजी राज्यपाल, उपमुख्यमंत्री, खासदार, मंत्री सर्व आमदार, सन्मानिय एम्बेसेडर पुण्याचे पिंपरी महापौर.. उपस्थित बंधूनो आणि भगिनींनी..

    आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस.. आज पुण्याची मेट्रो धावली, याचं पहिलं तिकीट मोदींनी मोबाईलवर पेमेंट करुन काढलं.. आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केलीये तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या.. अनेक अडचणी होत्या.. पण महामेट्रोचं अभिनंदन..महामेट्रोनं विक्रमी वेळात पुणे मेट्रोचं काम केलंय.

  • 06 Mar 2022 12:29 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरूवात

  • 06 Mar 2022 12:27 PM (IST)

    महापौर मुरलीधर मोहोळ यांचं संपुर्ण भाषण

    बऱ्याच वर्षापासून आपण जे स्वप्न पाहत होतो त्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. ज्यांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. ही महत्त्वाची घटना आहे. ६० वर्षानंतर पंतप्रधान पुण्यात आले. छत्रपती महाराजांनी जे आदर्श विचार मांडले जे तत्व मांडले त्याची प्रेरणा राजकीय मंडळी घेतील. मुळा आणि मुठा नदीच्या योजनेचा शुभारंभ होत आहे. ८४१ कोटी रुपये केंद्राने दिले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत आहे. जावडेकर, बापट आणि गडकरींनी या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान दिलं. फडणवीसांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घातलं. आता नद्यात गढूळ पाणी जाणार नाही आज पाच हजार कोटींचा एक प्रकल्प सुरू होत आहे. साबरमतीच्या धर्तीवर मुळा आणि मुठा नदी विकसीत होणार आहे. ४४ किलोमीटरच्या या नद्यांपैकी ९ किलोमीटरच्या नद्यांचं विकासाचं काम सुरू होणार आहे. नदीकाठ बनवला जाईल. जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकसह हरित पट्टे या नद्यांभोवती करणार आहोत.

    सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. १४३ ई बसेसचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. गेल्या तीन वर्षात १५०० ईबसेस आणि सीएनजी बसेस आणल्या. देशातील पहिला ई बस डेपो पुण्यता झाला. गडकरींच्या आग्रहास्तव हे करण्यात आलं.

    आर के लक्ष्मण यांच्या नावाने आर्ट गॅलरी करत आहोत. स्वच्छ सर्व्हेक्षणात तीन वर्षापूर्वी ३७ व्या स्थानावर असलेलं पुणे शहर पाचव्या स्थानावर आहे. पीएम आवाज योजने अंतर्गत सव्वालाख घरे बांधणार आहोत. दहा हजार घरे बांधलेही आहे. राहण्यासाठीचं योग्य शहर म्हणून पुणे पुढे आलं आहे.

  • 06 Mar 2022 12:21 PM (IST)

    महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून हिंदीतून भाषणाला सुरुवात!

  • 06 Mar 2022 12:18 PM (IST)

    मुरळीधर मोहोळ यांच्या भाषणाला सुरूवात

    मुरळीधर मोहोळ यांच्या भाषणाला सुरूवात

    व्यासपीठावर असलेल्या सगळ्यांचे स्वागत

    उपस्थित सगळयांचं स्वागत

    पुण्यनगरीत मोदींच स्वागत

    आज सगळ्यासाठी खुशीचा दिवस

    अनेक महापुरूषांची जन्मभुमी पुणे आहे.

  • 06 Mar 2022 12:15 PM (IST)

    एमआयटी कॉलेजमध्ये मोदीचं स्वागत

    एमआयटी कॉलेजमध्ये मोदीचं स्वागत

    मोदींना दिल्या भेट वस्तू

    कोल्हापूरच्या अंबाबाईची मुर्ती देऊन अजित पवारांनी केलं मोदींचं स्वागत

    आर के लक्ष्मी यांच्या पत्नीने मोदींना दिलं पुस्तक भेट

    मुरळीधर मोहोळ यांनी देखील केलं मोदीचं स्वागत

  • 06 Mar 2022 12:12 PM (IST)

    एमआयटी कॉलेजमध्ये कार्यक्रमाला सुरूवात

    एमआयटी कॉलेजमध्ये कार्यक्रमाला सुरूवात

    भाजपाच्या सर्व नेत्यांचं कार्यक्रमात स्वागत कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक मोठे नेते दाखल उपस्थितांचं देखील स्वागत 5 वर्षापुर्वी झालं होतं कामाचं उद्धघाटन

  • 06 Mar 2022 12:07 PM (IST)

    मोदींचं एमआयटी कॉलेजमध्ये स्वागत

    एमआयटी कॉलेजच्या स्टेजवरती अनेक भाजपाचे नेते

    शिवसेनेचे नेते सुभाष देसाई कार्यक्रमाला उपस्थित

    अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित

  • 06 Mar 2022 12:05 PM (IST)

    मोदीच्या गाड्यांचा ताफा एमआय कॉलेजमध्ये दाखल

    नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष

    मैदानात गर्दी

    चाहत्यांमध्ये उत्साह

    मेट्रोत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

  • 06 Mar 2022 12:02 PM (IST)

    भाजपाच्या या नेत्यांनी केलं मोदींचं स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे आगमन विमानतळावर पीएम मोदी यांचे राज्यपाल, मंत्री सुभाष देसाई, देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव यांनी केलं स्वागत

  • 06 Mar 2022 12:00 PM (IST)

    पुणे मेट्रोचे वेळापत्रक

  • 06 Mar 2022 11:58 AM (IST)

    गरवारे ते आनंद नगर पहिली मेट्रो धावली

    गरवारे ते आनंद नगर पहिली मेट्रो धावली

    आज महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन

    बालेवाडीत सुध्दा मोदी उद्घटनाला जाणार आहेत

    आज नेमके काय बोलतीय याकडे अनेकांचं लक्ष

  • 06 Mar 2022 11:54 AM (IST)

    1400 कोटींचा प्रकल्प

    1400 कोटींचा प्रकल्प

    गरवारे कॉलेज आनंद नगर मेट्रोचा मोंदीचा प्रवास

    पोलिस बंदोवस्त तैनात

  • 06 Mar 2022 11:50 AM (IST)

    काही वेळात मेट्रो दुस-या स्थानकात दाखली होईल

    काही वेळात मेट्रो दुस-या स्थानकात दाखली होईल. पुण्यातल्या पहिल्या मेट्रोचं पुणेकरांकडून जोरदार स्वागत

  • 06 Mar 2022 11:48 AM (IST)

    सजवलेली मेट्रो धावली

  • 06 Mar 2022 11:46 AM (IST)

    दिव्यांगांसोबत मोदींचा पुणे मेट्रो प्रवास 

    मोदींच्या मेट्रो प्रवासाला सुरूवात

  • 06 Mar 2022 11:32 AM (IST)

    मोदींनी परिधान केला राजमुद्रा असलेला शाही फेटा

  • 06 Mar 2022 11:29 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, फोटो पाहा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं.

    शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.

    यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

  • 06 Mar 2022 11:26 AM (IST)

    नरेंद्र मोदींनी घेतलं शिवाजी महाराजांचं दर्शन

  • 06 Mar 2022 11:21 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.

    यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

  • 06 Mar 2022 11:19 AM (IST)

    मोदींच्या स्वागताला भाजपामधील हे नेते

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

  • 06 Mar 2022 11:18 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा पुणे महापालिकेच्या आवारात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा पुणे महापालिकेच्या आवारात, सोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही.

  • 06 Mar 2022 11:17 AM (IST)

    नरेंद्र मोदी पुणे महापालितकेत दाखल

    नरेंद्र मोदी पुणे महापालितकेत दाखल

    महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन

  • 06 Mar 2022 11:06 AM (IST)

    पुण्यातील अलका चौकात काँग्रेस आंदोलन

    पुण्यातील अलका चौकात काँग्रेस आंदोलन

    राष्ट्रवादीकडून मुख आंदोलन

    मोदीच्या पुणे दौ-याला काँग्रेसचा विरोध

    कार्यकर्त्यांच्या हातात बॅनर

    पंतप्रधानांना दाखवणार काळे झेंडे

    पंतप्रधानांनी माफी मागावी

  • 06 Mar 2022 11:02 AM (IST)

    भाजपने याआधी केली होती वीर सावकारांचे नाव देण्याची मागणी

    – उदघाटनाच्या आधीच गरवारे मेट्रो स्टेशनच्या नामकरणावरून आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद,

    – भाजपने याआधी केली होती वीर सावकारांचे नाव देण्याची मागणी,

    – तर आता याच मेट्रो स्टेशनला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची केली राष्ट्रवादीने मागणी,

    – राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मोदींना देणार निवेदन

  • 06 Mar 2022 09:49 AM (IST)

    फेट्याला विरोध करून काँग्रेस राजकारण करत आहे

    – काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपकडून प्रत्युत्तर,

    – मोदींच्या विरोधात आंदोलनं करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जातंय,

    – फेट्याला विरोध करून काँग्रेस राजकारण करत आहे,

    – काँग्रेसचे राजकारण पुणेकरांना चांगलं माहीत आहे,भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका,

    – फेट्याच्या विषयावर काँग्रेसने राजकारण करू नये

  • 06 Mar 2022 08:08 AM (IST)

    नरेंद्र मोदी आज करणार मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण

    नरेंद्र मोदी आज करणार मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण

    गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनचं उद्घाटन

    गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर करणार मेट्रो प्रवास

    पोलिसांचा बंदोबस्त तैनात …

  • 06 Mar 2022 07:40 AM (IST)

    भाजपशासित पुणे मनपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात येणा-या फेट्याला कॉंग्रेसचा आक्षेप

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत आहेत. त्याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला असून, त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून कॉंग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये असा इशारा कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

Published On - Mar 06,2022 6:27 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.