Monsoon : अलनिनोच्या प्रभावामुळे चिंता वाढवणारी बातमी, राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

IMD Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे पावसाने जुलै महिन्याची सरासरी गाठली होती. परंतु ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून राज्यात पाऊस नाही. मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव दिसून येत आहे.

Monsoon : अलनिनोच्या प्रभावामुळे चिंता वाढवणारी बातमी, राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 9:10 AM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. जुलै महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टी झाली. यामुळे उशिराने दाखल झाल्यानंतर पावसाने सरासरी गाठली होती. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढू लागला होता. परंतु ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाने दडी मारली आहे. देशात मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. राज्यात पावसाची ही विश्रांती २० ऑगस्टपर्यंत असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

मॉन्सून निगेटीव्ही झोनमध्ये

ऑगस्ट महिन्यापासून पाऊस नाही. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. मान्सून एक टक्क्याच्या घटीसह निगेटिव्ह झोनमध्ये गेला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनमध्ये २९ टक्के कमी आहे. देशात १६ ऑगस्टपासून तर राज्यात २० ऑगस्टपासून मॉन्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

पुणे जिल्ह्यात कमी पाऊस

यंदा पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६५ टक्के कमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात १ ते १२ ऑगस्ट दरम्यान १२७ मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा केवळ ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यास चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे.

हे सुद्धा वाचा

पानशेत धरणाच्या पाण्याचे पूजन

पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणं 100 टक्के भरले आहे. यामुळे पानशेत धरणक्षेत्रातील वरसगाव खोऱ्यातील नागरिकांकडून धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. पुष्पहार, श्रीफळ, खण, ओटीचे साहित्य, हळद-कुंकू, जलाशयात अर्पण करण्यात आले. यावेळी वरसगाव प्रकल्पाचे शाखा अभियंता प्रतिक्षा मारके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

नाशिकमध्ये कांदा उत्पादक अडचणीत

कांदा उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पाऊस नसल्याने अडचणीत आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी टँकरने पाणी आणून कांदा पिकास पाणी देत आहे. कांद्याची रोपे चांगले ऊन नसल्यामुळे पिवळे पडत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.