Monsoon Update : खुशखबर, राज्यात मान्सूनचे आगमन, आयएमडीने केली घोषणा

Monsoon Update : राज्यात नैऋत्य मान्सूनचे रविवारी आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग अन् दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कामाला लागावे, परंतु पेरणीची घाई करु नये.

Monsoon Update : खुशखबर, राज्यात मान्सूनचे आगमन, आयएमडीने केली घोषणा
rain
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 2:12 PM

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो मान्सून आला आहे. राज्यात मान्सून आल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून आला होता, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे आता शेतकरी बांधवानी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे, परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे.

आयएमडीने केली घोषणा

राज्यात कोकणात पाऊस सुरु झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत होता. पुढचे दोन दिवस चक्रीवादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा दिला होता. किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किलोमिटरने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसाच्या सरी होत होत्या. परंतु आता मान्सून दाखल झाला आहे. ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.

काय केली घोषणा

पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यानी ट्विट करत मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनचे 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा,कर्नाटक, तामीळनाडू अन् आंध्रप्रदेशचा‌ काही भाग मान्सूनने व्यापला आहे.

मान्सूनचे काय आहेत निकष

  • केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हवामान खात्याची 14 स्टेशन आहेत. 10 मे नंतर या स्थानकांवर सलग दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस झाला, तर मान्सून दाखल झाल्याचे मानले जाते. ही 14 स्थानके आहेत- मिनिकॉय, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, थलासेरी, कन्नूर, केसरगोड आणि मंगळुरू.
  • वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये हवेचा दाब 600 हेक्टोपास्कल असावा. म्हणजे वारे कमी उंचीवरुन वाहायला हवेत. त्याची दिशा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हवी. ही वारे मान्सूनला भारताकडे खेचतात. मान्सूनला ढकलणारा वारा 5 ते 10 अंश उत्तर अक्षांश आणि 70-80 अंश रेखांश असावा. त्याचा वेग ताशी 28 ते 37 किलोमीटर असावा.
  • उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या डेटामध्ये ओएलआर मूल्य (पृथ्वीचा पृष्ठभाग, महासागर आणि वातावरणातून किती उष्णता सोडली जात आहे) 200 डब्ल्यू प्रति चौरस मीटरपेक्षा कमी असावा. त्याची दिशा 5 ते 10 असावी. ते उत्तरेकडे आणि 70 ते 75 अंश पूर्वेकडे असावे.
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.