Pune crime| फ्लॅटसाठी माहेरून पैसे न आणल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले ॲसिड

काही महिन्यांपूर्वी रेहानने फ्लॅट विकत घेतला. त्या फ्लॅटला भरण्यासाठी फिरदोसने तिच्या माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी पती रेहानने फिरदोसच्या मागे तगादा लावला. त्यासाठी सातत्याने तिला टोचून बोलणे , शिवीगाळ कारण्यास सुरुवात केली.

Pune crime| फ्लॅटसाठी माहेरून पैसे न आणल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले ॲसिड
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 10:21 AM

पुणे – शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमध्ये हुंड्यासाठी( dowry) छळ केला जास्त असलेल्या गुन्ह्याचे(Crime) प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. फ्लॅटचे पैसे फेडण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला फरशी पुसण्याचे ॲसिड पाजत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हांडेवाडी येथे हा प्रकार घडला आहे.  याबाबत फिरदोस रेहान काझी (वय 23 ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Police) पती रेहान काझी, सासू नजमा काझी , नणंद गजाला काझी व हीना खान यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी फिरदोस काझी व रेहान काझी पती पत्नी आहेत. लग्नानंतर दोघेही हांडेवाडीत राहण्यासाठी आले. गेल्या काही महिन्यांपूर्वी रेहानने फ्लॅट विकत घेतला. त्या फ्लॅटला भरण्यासाठी फिरदोसने तिच्या माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी पती रेहानने फिरदोसच्या मागे तगादा लावला. त्यासाठी सातत्याने तिला टोचून बोलणे , शिवीगाळ कारण्यास सुरुवात केली. यामध्ये सासू नजमा काझी व नणंद गजाला काझी व हीना खान यांनी छळ करण्यास सुरुवात केली. सतत सांगूनही पैसे आणत नसल्याने सासू व नणंदेंच्या मदतीने फारशी पुसण्याचे ऍसिड पाजत फिरदोसला पाजले. यानंतर फिरदोस यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीला त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

नागपूर शहरात आपली बसची चाके थांबली, पगार वाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हाल

Maha Shivratri 2022 | बेलाच्या पानावर महेश्वराची आराधना , 20 मिनिटांत साकारले डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र

Aurangabad | मंत्री दानवेंच्या जालन्याची पीटलाइन आधी, 116 कोटींची निविदा प्रसिद्ध, औरंगाबाद प्रश्न टांगणीवर!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.