MPSC : एमपीएससीची ऑनलाईन अर्जाची वेबसाईट डाऊन, विद्यार्थी हवालदिल, अखेर मुदतवाढ
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले होते. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऑनलाईन प्रणाली असणारी वेबसाईट डाऊन झाल्याचं समोर आलं होतं. आयोगाची ऑनलाईन अर्ज असणारी वेबसाईट प्रणाली बंद झाल्यांनं विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यास अडचणी येत असल्याची माहिती होती. पुण्यातील विद्यार्थ्यांनी याप्रकरणी आवाज उठवला आहे. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले होते. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २६९/२०२१) तसेच दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २७०/२०२१) करीता अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे. pic.twitter.com/G95q4yhEah
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 13, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षेचा अर्ज करण्यासाठी आजचा अखेरचा दिवस होता. वेबसाईट डाऊन असल्यानं अर्ज कसा करायचा असा सवाल विद्यार्थ्यांनी केला होता. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 269/2021) तसेच दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 270/2021) करीता अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबसाईट डाऊन असल्यानं आजचा अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थ्यांनी आयोगाकडे अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
गट क परीक्षा पदांचा तपशील
उद्योग निरीक्षक :- 103 पदे
दुय्यम निरीक्षक :- 114 पदे
तांत्रिक सहाय्यक :- 14 पदे
कर सहाय्यक :- 117 पदे
लिपिक टंकलेखक :- मराठी :- 473 पदे आणि इंग्रजी :- 79 पदे.
परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची मुदत
खुल्या प्रवर्गातील उमदेवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवासांठी 294 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 11 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.
इतर बातम्या: