Darshana Pawar : आरोपी अन् दर्शना पवार यांचे प्रेम होते का? पोलिसांनी काय दिली माहिती?
Darshana Pawar : MPSC परीक्षा पास झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणात मुख्य आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला कुठे अन् कसे पकडले? त्याने खून का केला? ही माहिती पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी पकडले आहे. तिचे हत्या उघड झाल्यानंतर पाच दिवसांपासून आरोपी राहुल हंडोरे फररा होता. अखेर गुरुवारी तो पोलिसांच्या सापळ्यात आला. पोलिसांचे एकूण पाच पथके त्याचा शोध घेत होते. आता राहुल याने दर्शनाचा खून का केला? याचा तपास पोलीस करणार आहे. त्यासाठी त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
काय माहिती दिली पोलिसांनी
दर्शना पवार हिचा मृतदेह पोलिसांना १८ जून रोजी सापडला होता. त्यानंतर त्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यामध्ये तिच्या दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळे हा खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा प्राथमिक अहवाल आला आहे. अजून विस्तृत अहवाल येणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अन् परिस्थितीजन्य पुराव्यावरुन राहुल आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचा तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली.
कसा सापडला राहुल
राहुल याचे लोकेशन वेगवेगळे येत होते. तो अधूनमधून नातेवाईकांच्या संपर्कात होतो. तो बंगालमध्ये गेला होतो. मग त्याचे लोकेशन मुंबई मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तयारी केली. मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने हा गुन्हा का केला? हे चौकशीत स्पष्ट होईल. आरोपीस आज न्यायालायत हजर करणार असून त्याची पोलीस कोठडी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रेम प्रकरण होते का?
दर्शना हिने राहुलशी लग्न न केल्यामुळे तिची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. परंतु आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतर यासंदर्भात डिटेल मिळणार आहे. आरोपी अन् दर्शनाचे प्रेम प्रकरण होते का? हे तपासात स्पष्ट होईल. परंतु दर्शनाच्या मामाचे घर अन् आरोपीचे घर समोरासमोर असल्यामुळे त्यांची लहानपणापासून ओळख आहे. दोन्ही नातेवाईक नाहीत, हे पोलिसांनी स्पष्ट केले.