काळ आला होता, पण..! दुचाकीला चुकवताना खासगी बस झाली पलटी; वेळीच मदत पोहचली म्हणून…
सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून बस काढण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आहे. बस काढपर्यंत महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती.
पुणे : मुंबई ते निजामबाद असा प्रवास करणाऱ्या खासगी बसला पुणे-सोलापूर हायवेवर यवतजवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर बस पलटी झाली, त्यामुळे बसमधील प्रवाशांनी जोरदार आरडाओरड सुरू केला होता. खासगी बसचा अपघात झाल्यामुळे बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या झालेल्या भीषण अपघातात 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाल्याचे कळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. अपघातानंतर या महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती.
मुंबईहून तेलंगणाला जाणाऱ्या खाजगी बसला यवतजवळ अपघात होताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बस अचानक पलटी झाल्याने बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर प्रवाशांना तात्काळ मदत करून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईहून तेलंगाना जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला असला तरी त्या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
या अपघातातील जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांची एक टीम तैनात करण्यात आली असून त्यांच्या तात्काळा उपचार सुरु करण्यात आले आहेत. मोटारसायकलला धडक लागू नये म्हणून चालकाने ब्रेक लावल्याने बस बाजूला पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर पोलिसांनी आणि नागरिकांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून बस काढण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आहे. बस काढपर्यंत महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती.