पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकला धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकचालकाचा मृत्यू

पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. (Express way accident Khalapur)

पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकला धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकचालकाचा मृत्यू
खालापूरजवळ अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 7:34 AM

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला. खालापूरजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिली. (Mumbai Pune Express way accident near Khalapur kills Truck Driver)

बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा अपघात घडला. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पंक्चर काढण्यासाठी ट्रक उभा होता. या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला.

अपघातात पुढच्या ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला, तर मागील ट्रकमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर काही दिवसांपूर्वीच विचित्र अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. टेम्पो, ट्रेलर, कारसह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता.

पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाट उतरताना फूडमॉलजवळ हा अपघात झाला होता. या अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते.

कसा घडला होता अपघात?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचूर झाला होता. (Mumbai Pune Express way accident near Khalapur kills Truck Driver)

या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुंबईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.

क्वालिसच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रसायनी पोलीस स्टेशन हद्दीतही क्वालिसचा अपघात घडला होता. अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने क्वालिस कार समोरच्या कंटेनरवर आदळली होती. या अपघातात 30 वर्षीय राहुल दलाने या तरुणाचा मृत्यू झाला, तर चालक सिद्धेश पटेल जखमी झाला.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर क्वालिस कंटेनरला धडकली, तरुणाचा मृत्यू, चालक जखमी

(Mumbai Pune Express way accident near Khalapur kills Truck Driver)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.