Expressway : अडीच तासांनंतर सुरू झाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग; स्वागत कमानीच्या कामासाठी 12 ते 2 करण्यात आला होता बंद

वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस तसेच एमएसआरडीसीचे (MSRDC) कर्मचारी याठिकाणी दाखल झाले होते. या दोन तासांच्या कामात वाहनचालकांसाठी हा मार्ग बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Expressway : अडीच तासांनंतर सुरू झाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग; स्वागत कमानीच्या कामासाठी 12 ते 2 करण्यात आला होता बंद
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली स्वागत कमानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 5:44 PM

पुणे : तब्बल अडीच तासांनंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai Pune Expressway) पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरुवातीला स्वागत कमान बसविण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 या वेळेत किवळे ते सोमटणे गावापर्यंतचा महामार्ग बंद करण्यात आला होता. ही वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर वळवून ती सोमटणे फाट्यावरून पुन्हा द्रुतगती महामार्गावर आणण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्यावर आता द्रुतगती महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 यावेळेत ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्यासाठी एक्स्प्रेस हायवेवर हा ब्लॉक (Block) घेण्यात आला होता. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस तसेच एमएसआरडीसीचे (MSRDC) कर्मचारी याठिकाणी दाखल झाले होते. या दोन तासांच्या कामात वाहनचालकांसाठी हा मार्ग बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पर्यायी मार्गांमुळे अडचण नाही

12 ते 2 या दोन तासांसाठी मेगा ब्लॉक घेतला गेला होता. पिंपरी चिंचवड पोलीस त्याचप्रमाणे एमएसआरडीसीचे अधिकारी याठिकाणी सकाळपासूनच दाखल झाले होते. दुपारी 12च्या दरम्यान कामास सुरुवात करण्यात आली. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून आधीच याठिकाणी कर्मचारी दाखल होत पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देताना दिसून येत आले. काम सुरळीत पार पडावे, तसेच वाहनचालकांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती. सुरक्षेचीदेखील काळजी पोलीस आणि एमएसआरडीसीकडून घेण्यात येत होती.

हे सुद्धा वाचा

वाहतूक सुरू

दोन तासांत काम पूर्ण

एमएसआरडीसीतर्फे ही स्वागत कमान लावण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे, असा आशय असलेली ही स्वागत कमान दोन तासांत लावण्यात आली. या दोन तासांसाठी महामार्ग बंद करण्यात आला होता. साधारण दुपारी दोनच्या आसपास दोन लेनमधील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर नंतर सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली. कामादरम्यानही सर्व वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने यावेळी दिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.