Pune crime : जमिनीच्या वादातून खून करत लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ फेकला मृतदेह; मुख्य संशयितासह चौघांना अटक

पोलिसांनी कांबळे आणि साथीदार पवन हनवते (22), प्रकाश कांबळे (52) आणि इरफान खान (20) यांना आता अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणकर यांचे कारमध्ये अपहरण करून गळा आवळून, धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.

Pune crime : जमिनीच्या वादातून खून करत लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ फेकला मृतदेह; मुख्य संशयितासह चौघांना अटक
Dombivali Gas CrimeImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:20 PM

पुणे : जमिनीच्या वादातून (Land dispute) एका 60 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील 60 वर्षीय वकिलाचा समावेश असलेल्या बेपत्ता व्यक्ती प्रकरणाच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. मुळशी येथील जमिनीच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून त्यांचे अपहरण करून खून (Murder) करण्यात आला आहे. खून करून नंतर मृतदेह लोणावळ्यातील डोंगराळ भागात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी 22 वर्षीय मुख्य संशयितासह चार जणांना अटक केली आहे. मृत मिलिंद दत्तात्रय शिवणकर (वय 60) हे कोथरूड येथे वकील (Lawyer) होते. ते गेल्या काही वर्षांपासून मुळशी परिसरात जमिनीचे व्यवहार करत होते. 12 मे रोजी शिवणकरच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तो 11 मे पासून मुळशी परिसरातून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

शिवणर यांच्याशी झाले भांडण

विक्रांत सुभाष कांबळे (22) या संशयिताचा सुगावा पोलिसांना लागला होता. मुळशीतील कासार आंबोली येथील रहिवासी असलेल्या कांबळेचे शिवणकर यांच्याशी भांडण झाले. कारण त्याला वाटले, की त्याने दोन जमिनीच्या व्यवहारात आपली फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट परिसरातील एका हॉटेलमध्ये कांबळे आणि इतर काही जणांना भेटल्यानंतर शिवणकर बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध पोलीस घेत होते. त्यांच्या घरच्यांनीही ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

हे सुद्धा वाचा

लोणावळ्यातील टायगर पॉइंटजवळील डोंगराळ भागात टाकून दिला मृतदेह

पोलिसांनी कांबळे आणि साथीदार पवन हनवते (22), प्रकाश कांबळे (52) आणि इरफान खान (20) यांना आता अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणकर यांचे कारमध्ये अपहरण करून गळा आवळून, धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह लोणावळ्यातील टायगर पॉइंटजवळील डोंगराळ भागात टाकण्यात आला. चार संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.