Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagar Panchayat Election : पुण्यातल्या 13 पंचायत समित्यांच्या प्रभागरचना 2 जूनला प्रसिद्ध होणार, निवडणुकांची जंगी तयारी

पावसाळ्यात निवडणुका घेणे कठीण जाणार आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप आपल्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही.

Nagar Panchayat Election : पुण्यातल्या 13 पंचायत समित्यांच्या प्रभागरचना 2 जूनला प्रसिद्ध होणार, निवडणुकांची जंगी तयारी
निवडणूक (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 11:43 PM

पुणे : राज्यात आता महानगरपालिका (Municipal Corporation Election) आणि पंचायत समित्या (Panchayat Raj Election) तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची (Jilha Parishad Election) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिकांची प्रभागरचनाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. या निवडणुकांबरोबर पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकाही पार पडत आहेत. त्यासाठी  जिल्हा परिषद पुणे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील13 पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट 3 व परिशिष्ट 3(अ) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा परिषद पुणे, सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याअनुषंगाने पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभागरचनेस विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार ही प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हरकती स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापना

राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या 13 पंचायत समित्यांचा निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांच्या हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, बी विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कार्यालयीन वेळेत 2 ते 8 जून 2022 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

हे सुद्धा वाचा

यावेळच निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय पाड पडल्या होत्या तसेच यावेळच्या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे आदेश दिले आहे. मात्र ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी अजूनही राज्य शासनाकडून सुप्रीम कोर्टात प्रयत्न सुरू आहेत. तसेच पावसाळ्यात निवडणुका घेणे कठीण जाणार आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप आपल्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.