Pune crime : या दहशतीतून मुक्त करा, खुनाच्या घटनेनंतर नाना पेठेतले नागरिक आक्रमक; समर्थ पोलिसांत धाव

कोयत्याने सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या 30 सेकंदात कोयत्याने 35 वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

Pune crime : या दहशतीतून मुक्त करा, खुनाच्या घटनेनंतर नाना पेठेतले नागरिक आक्रमक; समर्थ पोलिसांत धाव
लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:27 PM

पुणे : पुण्यातील नाना पेठेत झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक समर्थ पोलीस स्टेशनमध्ये (Samarth Police Station) दाखल झाले होते. काल झालेल्या खुनाच्या नंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या खुनामागे मुंबईतील गँगचे कनेक्शन असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. या दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पुण्यातील नाना पेठेत (Nana peth) असणाऱ्या नवा वाडा येथे पूर्व वैमनस्यातून अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. चाकूने भोसकून अतिशय निर्घृण पद्धतीने ही हत्या (Brutal murder) करण्यात आली होती.

नेमकी घटना काय?

कोयत्याने सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या 30 सेकंदात कोयत्याने 35 वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नाना पेठेतील नवा वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा परिसर पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. अक्षय वल्लाळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे या दोन आरोपींना समर्थ पोलिसांनी अटक केली. दोन्हीही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. या गुन्हेगारांना अटक केली असली तरी परिसरात अनेक ठिकाणी टोळ्या आणि त्यांची दहशत पाहायला मिळते. त्यावर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे दिसते. दोघे आरोपी आणि अक्षय वल्लाळ आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो. त्यानंतर अचानक एक जण त्याच्यावर सपासप वार करू लागतो. हे गुन्हेगार इतरे सराईत आणि निर्दयी आहेत, की त्यांनी अवघ्या काही सेकंदात 30 ते 35 वार अक्षयवर केले. या घटनेत या तरुणाचा जीव गेला. आता येथील नागरिक संतप्त झाले आहेत.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.