Nashik Pune NHC : नाशिक-पुण्यातील ट्रॅफिक जॅमवर जालीम उपाय; अतिजलद राष्ट्रीय महामार्ग कॉरिडार वाहतूक कोंडी फोंडणार, तुमचा असा वेळ वाचणार

Superfast National Highway Corridor : भारतात आता नवीन 8 अतिजलद राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर होऊ घातले आहे. यामुळे विकासाला आणि दळणवळणाला बुस्टर डोस मिळणार आहे. नाशिक-पुण्यातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.

Nashik Pune NHC : नाशिक-पुण्यातील ट्रॅफिक जॅमवर जालीम उपाय; अतिजलद राष्ट्रीय महामार्ग कॉरिडार वाहतूक कोंडी फोंडणार, तुमचा असा वेळ वाचणार
नाशिक पुणे अतिजलद राष्ट्रीय महामार्ग
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 11:33 AM

देशातील मोठ्या शहरांच्या मानगुटीवर ट्रॅफिक जामचे भूत कायम बसलेले असते. बड्या शहरांचा पसारा वाढत चाललेला आहे. बाहेरुन येणारी वाहनं आणि शहरातील वाहने यामुळे रस्त्यावर वाहनांचा महापूर येतो आणि वाहतूक कोंडी होते. सकाळी कार्यालयात, एमआयडीसी जाण्याची एकच धांदल उडालेली असते. तर संध्याकाळी परतीचा प्रवास असतो. या काळात सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. त्यासाठी आता केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय अतिजलद महामार्ग कॉरिडॉर योजना हाती घेतली आहे. त्यात नाशिक-पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या 8 ठिकाणी नवीन कॉरिडॉर

देशातील मोठ्या शहरांना जोडण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे बड्या शहरातील वाहतूक कोंडी फुटेल. आर्थिक निर्णय घेणाऱ्या कॅबिनेट समितीने याविषयीचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करते. यामध्ये देशात 8 महत्वपूर्ण राष्ट्रीय अतिजलद महामार्ग कॉरिडॉर विकसीत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

या कॉरिडॉरसाठी 50,655 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आग्रा-ग्वाल्हेर राष्ट्रीय अतिजलद महामार्ग, खरगपूर-मोरेगाव चार पदरी कॉरिडॉर, थरद-देसा-म्हैसाणा-अहमदाबाद राष्ट्रीय अतिजलद कॉरिडॉर, अयोध्या रिंग रोड, रायपूर-रांची राष्ट्रीय अतिजलद कॉरिडॉर, कानपूर रिंग रोड, गुवाहाटी बायपास, नाशिक फाटा-पुणे खेड कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

नाशिक-पुण्याला मोठा फायदा

राष्ट्रीय अतिजलद कॉरिडॉर हा नाशिक फाटा ते पुण्याजवळ खेडपर्यंत असेल. हा 30 किलोमीटरचा महामार्ग आहे. हा महामार्ग 8 पदरी आहे. या कॉरिडॉरसाठी 7,827 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नाशिक आणि पुणे पट्ट्यातील एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगार, उद्योजकांना जलदरित्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी, उद्योगांच्या ठिकाणी जाता यावे यासाठी हा महामार्ग अंतर्गत इतर मोठ्या रस्त्यांशी जोडण्यात येईल.

चाकण, भोसरी, NH-60 या दरम्यान नाशिक आणि पुणे यांच्यातील इतर औद्योगिक वसाहतींना या कॉरिडॉरमार्फत जोडण्यात येईल. त्यामुळे येथे जलद प्रवास शक्य होईल. या नवीन कॉरिडॉरमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.