AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती ते राजीनामा नाट्य…, अजित पवार यांच्या सवालावर शरद पवार यांचे सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गौप्यस्फोटांना आज प्रत्युत्तर दिलं. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे यावेळी शरद पवारांनी बारामतीपासून ते राजीनामा नाट्यबाबत अजित पवारांनी केलेल्या विविध दाव्यांवर प्रत्युत्तर दिलं.

बारामती ते राजीनामा नाट्य..., अजित पवार यांच्या सवालावर शरद पवार यांचे सडेतोड उत्तर
sharad pawar and ajit pawar
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 5:53 PM

पुणे | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणि त्यांच्या गटातील नेत्यांकडून भाजप पक्षासोबत जाण्याबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात करण्यात आला. त्या गौप्यस्फोटांना शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तरे दिली. “अजित पवार जे काही बोलले त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. त्यांच्या बोलण्यात काही स्फोट होता का, वाव होता का, बॉम्ब होता का फटकडा होता का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल”, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षपदाबाबतच्या राजीनाम्याबाबत जे गौप्यस्फोट केले त्यावरही शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली.

“मी राजीनामा देतो म्हणायचं कारण काय? पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयासोबत आम्हाला जायचं होतं”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. “मी राजीनामा दिला तर परत करायचा असेल तर मला आनंद परांजपे किंवा जितेंद्रची परवानगी घ्यायची गरज नाही. मला यांना बोलावून सांगायची गरज नव्हती. माझा निर्णय घेण्याची कुवत माझ्यात आहे. राजीनामा देण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्यात वेगवेगळ्या गोष्टीच्या चर्चा होत्या. पण कुणाला तरी सांगू राजीनामा देतो अशी स्थिती नव्हती”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.

‘आमची लोकं भाजपविरोधी भूमिका घेऊन निवडून आले’

“माझ्याकडून कधीच बोलावणं गेलं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. कोणताही सदस्य माझ्याशी सुसंवाद ठेवू शकत होता. चर्चा झाली होती. पण ते ज्या झटक्याने भाजपसोबत जाण्याचा विचार करत होते. तो विचार जनमाणसात जे शब्द दिले त्याच्याशी सुसंगत नव्हता. आम्ही विधानसभेत मतं मागितली ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. भाजपच्या विरोधात होती. आमचे लोक ज्या कारणाने निवडून आले त्याला लोकांचा पाठिंबा होता”, असं शरद पवार म्हणाले.

‘आमची शिवसेनेबाबतची भूमिका वेगळी’

“आमच्या शिवसेना आणि भाजपचया भूमिकेबाबत फरक आहे. आमची शिवसेनेबाबतची भूमिका वेगळी आहे. आमची आजही भूमिका भाजपविरोधी आहे. तितकी शिवसेना विरोधी नाही. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र बसून सरकार बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता. आज जे विरोध करत आहेत. ते त्या चर्चेत होते. पदावर आरूढ होते. हा फरक आहे”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांची बारामतीत निवडणूक लढवण्याची घोषणा, शरद पवार म्हणाले…

अजित पवार यांनी बारामतीतही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “संसदीय लोकशाहीत कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन कोणत्याही मतदारसंघात जाऊ शकतो. बारामती असो की अन्य मतदारसंघ असो. तिथे अन्य पक्षाचे लोक तिथे जाऊन भूमिका मांडू शकतात. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली तर त्यात तक्रार करण्याचं कारण नाही”, असं शरद पवारांनी उत्तर दिलं.

शरद पवार आणखी काय-काय म्हणाले?

  • आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
  • अजित पवारांनी बोलावलेल्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदात कळाल्या.
  • त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती.
  • आमची भूमिका भाजपच्या विरोधात आहे.
  • राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय झाला होता.
  • प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तक लिहिण्याची वाट बघतोय. प्रफुल्ल पटेल यांचं दिल्लीतील घर ईडीने ताब्यात घेतलं होतं. ते देखील त्यांनी पुस्तकात लिहावं.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.