पुणे शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कोणाच्या बाजूने, कोणी केला मोठा दावा

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारले. त्यानंतर कोण कोणाबरोबर जाणार आहे, यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या पुणे शहरातील नगरसेवक कोणासोबत? हा प्रश्न आहे.

पुणे शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कोणाच्या बाजूने, कोणी केला मोठा दावा
इथेच काका-पुतण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 12:43 PM

प्रदीप कापसे, पुणे : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप पुन्हा एकदा झाला आहे. रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी आपला गट तयार केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच ४० पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांच्यांसोबत असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असणाऱ्या पुणे शहरातून कोण कोणासोबत आहे? ही चर्चाही आता रंगली आहे. त्यात महानगरपालिकेतील ४३ माजी नगरसेवकांसंदर्भात मोठा दावा केला गेला आहे.

कोण आहेत कोणासोबत

पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शरद पवार यांच्या बाजूने आहेत, असा दावा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी नगरसेवकांची संख्या ४३ होती. हे सर्व ४३ जण शरद पवार यांच्यांसोबत आहे, असा दावा जगताप यांनी केला आहे. तसेच जवळपास ७० माजी नगरसेवक शरद पवार यांना पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी कार्यालयात शुकशुकाट

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडीनंतर सोमवारी पुणे शहरातील पक्ष कार्यालयात शुकशुकाट होता. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात एकही कार्यकर्ता नव्हता. परंतु राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठली अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रविवार रात्रीपासूनच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी करडामध्ये गेले. ते त्यानंतर राज्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे अजित पवार मुंबईत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट होता. अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक मुंबईत पोहचले होते. त्यांच्या बंगल्यावर राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.

हे ही वाचा

पुणे खेडचे आमदार कोणासोबत? अजित पवार की शरद पवार?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.